GST Collection
GST Collection  Saam tv
बिझनेस

GST Collection : जीएसटी संकलनात एप्रिल ते डिसेंबरमध्ये १२ टक्क्यांची वाढ, डिसेंबरमध्ये कोटींची संकलन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

GST Collection News :

भारतात २०२३ च्या जून महिन्यात १.४४ लाख कोटी रुपयांचा जीएसटी संकलन करण्यात आला. जून महिन्यातील जीएसटी संकलन वार्षिक आधारावर इतर महिन्यांच्या तुलनेत ५६ टक्के अधिक होतो. तर डिसेंबरमध्ये कोटींचे संकलन करण्यात आले आहे.

अशातच २०२३ च्या आर्थिक वर्षभराचा जीएसटी संकलन सरकारकडून जाहिर करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या ९ महिन्यांत एकत्रित जीएसटी (GST) संकलन सरासरी 1.66 लाख कोटी रुपये आहे.

डिसेंबर 2023 साठी 1,64,882 कोटी एकत्रित जीएसटी महसूल संकलन

एप्रिल-डिसेंबर 2023 कालावधीत, सकल वस्तू आणि सेवा कर संकलन 12% वर्ष - दर - वर्ष मजबूत वाढ नोंदवत 14 .97 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागच्या वर्षी (एप्रिल-डिसेंबर 2022) याच कालावधीत 13.40 लाख कोटी रुपये (Money) एकत्रित वस्तू आणि सेवा कर संकलन झाले होते.

या वर्षी पहिल्या 9 महिन्यांच्या कालावधीत झालेले 1.66 लाख कोटी रुपयांचे सरासरी मासिक एकत्रित वस्तू आणि सेवा कर संकलन हे आर्थिक वर्ष 23 च्या याच कालावधीतील 1.49 लाख कोटी रुपयांच्या सरासरीच्या तुलनेत 12% वाढ दर्शवते.

डिसेंबर 2023 मध्ये संकलित झालेला एकत्रित वस्तू आणि सेवा कर महसूल 1,64,882 कोटी रुपये आहे. यापैकी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर 30,443 कोटी रुपये, राज्य वस्तू आणि सेवा कर 37,935 कोटी, एकात्मिक वस्तू आणि सेवा कर 84,255 कोटी रुपये ( यामध्ये आयात केलेल्या मालावर संकलित केलेल्या 41,534 कोटी रुपयांचा समावेश आहे ) उपकर 12,249 कोटी रुपये आहे (यामध्ये आयात केलेल्या मालावर संकलित केलेल्या 1,079 कोटी रुपयांचा समावेश आहे). यामध्ये 1.60 लाख कोटी रुपयांहून अधिक संकलन झालेला या वर्षी आतापर्यंतचा हा सातवा महिना आहे.

सरकारने एकात्मिक वस्तू आणि सेवा करातून 40,057 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि 33,652 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात प्रदान केले आहेत. नियमित निपटाऱ्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल केंद्रीय वस्तू आणि सेवा कर रुपात 70,501 कोटी रुपये आणि राज्य वस्तू सेवा कर रुपात 71,587 कोटी रुपये इतका आहे.

डिसेंबर 2023 मधील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील वस्तू आणि सेवा कर महसुलापेक्षा 10.3% जास्त आहे. या महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) संकलित झालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 13% जास्त आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT