Gold Silver Rate (2nd January 2024): नव्या वर्षात सोन्याला झळाळी, चांदीच्या किमतीतही वाढ; आजचा दर किती? जाणून घ्या

Today's (2nd January 2024) Gold Silver Rate In Maharashtra: नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मागच्या वर्षात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली. परंतु, नवीन वर्षात सोनं अधिक माहागण्याची शक्यात वर्तवण्यात आली आहे.
Gold Silver Rate (2nd January 2024)
Gold Silver Rate (2nd January 2024)Saam Tv

Gold Silver Rate In Maharashtra (2nd January 2024 ):

नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मागच्या वर्षात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली. परंतु, नवीन वर्षात सोनं अधिक माहागण्याची शक्यात वर्तवण्यात आली आहे.

आखाती देशातील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर पाहायला मिळाली. मंदावलेली जागतिक स्थितीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव वाढू शकतो असे व्यापाऱ्यांनी मत मांडले आहे.

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात कपात करण्याच्या शक्यतेमुळे मंगळवारी यूएसमध्ये सोन्याच्या किमती वाढल्या. सोन्याच्या वाढत्या दरामुळे त्याचा खरेदीदारांवर परिणाम होताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने (Gold) प्रति औंस $2,058 च्या जवळपास आहे. यामुळे नवीन वर्षात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जाणून घेऊया आजचा मुंबई-पुण्यातील भाव

Gold Silver Rate (2nd January 2024)
Petrol Diesel Rate (2nd January): इंधनाच्या तुटवड्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, आजचा भाव काय?

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८९० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६४,२४० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)वाढ झालेली आज पाहायला मिळाली. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,९०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६४,०९० रुपये

  • पुणे - ६४,०९० रुपये

  • नागपूर - ६४,०९० रुपये

  • नाशिक - ६३,१२० रुपये

  • ठाणे - ६४,०९० रुपये

  • अमरावती - ६४,०९० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com