GST Collection april  Saam TV
बिझनेस

Gst Collection : लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने इतिहास रचला; पहिल्यांदा जीएसटी वसुली २ लाख कोटी पार

GST Collection in April: लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने इतिहास रचला आहे. सरकारने एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी कलेक्शनचे आकडे जाहीर केले आहेत.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने इतिहास रचला आहे. सरकारने एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी कलेक्शनचे आकडे जाहीर केले आहेत. एप्रिल महिन्याची आकडेवारी रेकॉर्ड स्तरावर पोहोचली आहे. नव्या आर्थिक वर्षात जीएसटी वसुलीत इतिहास रचला आहे.

जीएसटी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा वसुली ही २ लाख कोटी रुपये पार पोहोचली आहे. सरकारी आकड्यानुसार, जीएसटी वसुली ही २.१० लाख कोटी रुपये झाली आहे.

जीएसटी वसुलीमध्ये मागील वर्षातील एप्रिल महिन्याच्या आधारावर तुलना केल्यास या महिन्यात १२.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निव्वळ महसूल रिफंडनंतर १.९२ लाख कोटी रुपये इतकं आहे. एप्रिल २०२४ महिन्यात एकूण जीएसटी कलेक्शनमध्ये सेंट्रल जीएसटी ४३,८४६ कोटी रुपये, स्टेट जीएसटी ५३,५३८ कोटी रुपये, आयजीएसटी ९९,६२३ कोटी रुपये आणि सेस १३,२६० कोटी रुपयांचा समावेश आहे.

एप्रिल २०२३ मध्ये केला होता विक्रम

एप्रिलमध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये मार्चमध्ये चांगली वसुली झाली होती. मार्च २०२४ महिन्यात १.७८ लाख कोटी रुपये जीएसटी कलेक्शन झालं होतं. आतापर्यंत विक्रमी जीएसटी वसुली ही एप्रिल २०२३ मध्ये झाली होती. सरकारकडे १.८७ लाख कोटी रुपये जमा झाले होते.

तत्पूर्वी, जीएसटी १ जुलै २०१७ रोजी लागू झाला. या जीएसटीमुळे अप्रत्यक्ष करातील गुंता दूर केला. या कर प्रणालीमुळे व्हॅट, एक्साइज ड्यूटी, सर्व्हिस टॅक्स सारखे १७ टॅक्स रद्द झाले आहेत. वर्षाला ४० लाख टर्नओव्हर असलेला व्यवसाय हा जीएसटीमध्ये सामील करण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT