Griha Lakshmi Yojana Saam Tv
बिझनेस

Griha Lakshmi Yojana: महिलांना आता मिळणार २००० रुपये, गृहलक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Griha Lakshmi Yojana For Women: कर्नाटक सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना २००० रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी राबवण्यात आल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. केंद्र सरकारसोबत विविध राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आहे तर मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना योजना राबवण्यात आली आहे. अशीच एक योजना कर्नाटक सरकारने राबवली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदत केली जाते. (Scheme For Women)

कर्नाटक सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना २००० रुपये दिले जातात.या योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.

कर्नाटक सरकारची ही योजना राहुल गांधी यांनी सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर केले जातात.या योजनेअंतर्गत महिलांना खूप फायदा होणार आहे.

कर्नाटक सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत १७५०० कोटी रुपये मंजूर केले होते. या योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी महिलांना लाभ मिळत आहे. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत अंत्योदय, दारिद्रय रेषेखाली महिलांना, दारिद्रय रेषेच्या वर (APL)रेशन कार्डधारकांनाया योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील फक्त एका महिलेलाच लाभ मिळणार आहे. तसेच ज्या महिला आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती टॅक्स करत आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. (Women Will Get 2000 Rupees)

कर्नाटकच्या महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला २००० रुपये दिले जातात. अशाच अनेक योजना विविध राज्य सरकारने राबवल्या आहेत. महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेअंतर्गतदेखील महिलांना पैसे दिले जातात. (Griha Lakshmi Yojana)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारताव्यतिरिक्त 'या' देशांमध्येही रुपया चालतो, प्रवास करण्याआधी जाणून घ्या

Big Boss 18: अशनीर ग्रोव्हरची बिग बॅासमध्ये एन्ट्री; सलमान खानने घेतली शाळा,VIDEO व्हायरल

Shahapur Vidhan Sabha : शहापूरमध्ये मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भेटीनंतर बबन हरणेंचा मविआला पाठींबा

Money Astrology: या राशींचे लोक होणार धनवान, रखडलेले पैसेही हातात मिळणार

Jayant Patil: भरणेसारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करा, जयंत पाटील यांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT