Karnataka News: कर्नाटक सरकारकडून गणपती बाप्पाला अटक? पूजनाला सरकारचा विरोध? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Viral Satya: आता बातमी आहे व्हायरल व्हिडीओची. सोशल मीडियात गणपती बाप्पाच्या मूर्तीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. त्यात कर्नाटक सरकारनं चक्क गणपती बाप्पालाच अटक केल्याचा दावा करण्यात आलाय. साम टीव्हीनं या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली, तेव्हा काय सत्य समोर आलं जाणून घेऊ...
कर्नाटक सरकारकडून गणपती बाप्पाला अटक? पूजनाला सरकारचा विरोध? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Karnataka NewsSaam Tv
Published On

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा अर्चा सुरू आहे. अशाचत एक व्हिडीओनं सोशल मीडियात खळबळ उडालीय. या व्हिडीओत पोलिसांनी गणपती बाप्पालाच अटक केल्याचा दावा करण्यात आलाय.

या व्हिडीओत काही कार्यकर्ते घोषणाबाजी करतायेत. तर पोलिसांनी गणपतीची मूर्ती ताब्यात घेतल्याचं दिसतंय. याच व्हिडीओवरून सोशल मीडियात चर्चांना उधाण आलं. व्हायरल मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय, जाणून घेऊ...

कर्नाटक सरकारकडून गणपती बाप्पाला अटक? पूजनाला सरकारचा विरोध? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Marathwada Politics: उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा! भुमरे-बोरनारेंचं टेंशन वाढणार? काय आहे ठाकरेंची नवी रणनीती? वाचा...

''देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस शासित कर्नाटक सरकारनं गणपती बाप्पाला अटक केली. काँग्रेसला मत देणाऱ्या हिंदूंना लाज वाटायला हवी'', हा मेसेज व्हायरल होतोय. गणपती बाप्पा हा श्रद्धेचा विषय असल्यानं साम टीव्हीनं या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली. आम्ही हा नेमका प्रकार काय आहे हे शोधून काढलं. तेव्हा आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं, जाणून घेऊ...

व्हायरल व्हिडीओ कर्नाटकातल्या बंगळुरूतला आहे. 13 सप्टेंबरला मांड्या जिल्ह्यात धार्मिक हिंसाचार उफळला होता. त्याचा निषेध करण्यासाठी काही जण रस्त्यावर उतरले होते. त्यापैकी एका व्यक्तीनं आंदोलनात गणपती बाप्पाची मूर्ती आणली. परवानगी न घेता आंदोलन केल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यावेळी पोलिसांनी गणपती बाप्पाची मूर्तीही पोलिस व्हॅनमध्ये ठेवली.

कर्नाटक सरकारकडून गणपती बाप्पाला अटक? पूजनाला सरकारचा विरोध? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Rahul Gandhi: 'राहुल गांधी देशाचा नंबर वन दहशतवादी', भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

त्यामुळे आमच्या पड़ताळणीत कर्नाटक सरकारनं गणपती बाप्पाला अटक केल्याचा दावा असत्य ठरलाय. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यावेळी आंदोलकांच्या हातात गणपतीची मूर्ती होती. पोलिसांनी कुणालाही गणेश पूजनासाठी विरोध केला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com