भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केलंय. त्यातच शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत ठाकरेंकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.
आधी आदित्य ठाकरेंचा मराठवाडा दौरा तर आता खुद्द उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत आव्हान उभं केलंय. मात्र ठाकरेंची मराठवाड्यात ताकद किती? जाणून घेऊ...
शिवसेनेच्या (Shiv Sena) 12 पैकी 3 आमदार ठाकरे गटाकडे आहेत.
संभाजीनगर वगळता परभणी, धाराशिव, हिंगोलीत लोकसभेला विजय.
संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), परभणी, धाराशिव, नांदेड (Nanded) आणि हिंगोलीतील मतदारसंघांवर प्रभाव.
मुंबई (Mumbai), कोकणानंतर ठाकरेंचा सर्वाधिक प्रभाव मराठवाड्यात आहे. शिवसेनेतील फुटीनंतर याच मराठवाड्यातील लोकसभेच्या (Lok Sabha) 4 पैकी 3 जागा जिंकत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपला वरचष्मा कायम राखलाय.
तर विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Election 2024) पक्ष फुटीने दुखावलेल्या ठाकरेंनी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे आणि पैठणमधून इच्छूक असलेल्या संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरेंच्या मतदारसंघात सभा घेत शिंदे गटाचं टेंशन वाढवलंय.. त्यामुळे विधानसभेला ठाकरे आपला मराठवाड्याचा (Marathwada) बालेकिल्ला राखण्यात यश मिळवणार का? याकडे लक्ष लागलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.