रस्त्यावर सोन्याचा पाऊस? सोनं वेचण्यासाठी लोकांची झुंबड?

Fact Check: रस्त्यावर सोनं पडल्याची अफवा पसरली आणि एकच झुंबड उडाली...बघा, कसे हे लोक रस्त्यावर सोनं पडलंय म्हणून गोळा करतायत...रस्त्यावर पडलेलं सोनं वेचतायत...पण, खरंच रस्त्यावर सोनं कुठून पडलं...? सोन्याचा पाऊस पडल्याचा काहींनी दावा केलाय...? पण, खरंच हे रस्त्यावर सोनं पडलंय का...? हा व्हिडिओ कुठला आहे...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...
Crowd gathers on road collecting shiny metal pieces mistaken for gold in viral video.
Crowd gathers on road collecting shiny metal pieces mistaken for gold in viral video.saam tv
Published On

रस्त्यावर सोनं पडलंय अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ते गोळा करण्यासाठी लोक जमले...महिला, मुलं, काही व्यक्ती सोनं गोळा करत असताना दिसतायत...हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेकजण रस्त्यावर सोनं पडलेलं जमा करण्यासाठी जमले...गुजरातच्या वलसाडमधील हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय..पण, खरंच सोनं पडलंय का...? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...गुजरातच्या वलसाडमध्ये असं कुठे सोनं रस्त्यावर पडलं का...? याची आम्ही माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

रस्त्यावर सोन्याचा पाऊस पडल्याची अफवा

हायवेवरून जाणाऱ्या ट्रकमधून काही धातूचे तुकडे पडले

तांबे आणि पितळाचे छोटे तुकडे पडले होते

उन्हाची किरणं त्यावर पडल्यामुळे सोन्यासारखे चमकू लागले

प्रत्येक चमकणारी वस्तू हे सोनंच नसते याचा प्रत्यय वलसाडच्या या घटनेवरून येतोय...एका अफवेमुळे भर उन्हात लोक तासनतास पितळ वेचत बसले. शेवटी हाती काहीच लागलं नाही, लागली ती फक्त निराशा...त्यामुळे सोशल मीडियावर अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी सत्यता नक्की तपासा...आमच्या पडताळणीत रस्त्यावर सोन्याचा पाऊस पडल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com