Maharashtra News Live Update: शिरपूरच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी गर्दी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल; विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट, काही ठिकाणी अवकाळी पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

Dhule : शिरपूर येथील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी गर्दी

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या परिस्थिचे परिणाम शिरपूर येथील पेट्रोल पंपांवर

शिरपूर शहरातील एकूण सहा पेट्रोल पंप पैकी चार पेट्रोल पंपांवर पेट्रोल शिल्लक नसल्याने वाहनधारकांना बसत आहे फटका

शहरात फक्त दोनच पेट्रोल पंपांवर पेट्रोल शिल्लक असल्यामुळे वाहनधारकांची या दोन पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी उसळली गर्दी

तासनतास रांगेमध्ये उभे राहून देखील पेट्रोल मिळत नसल्यामुळे वांधारकांना सोसावा लागत आहे नाहक त्रास

pune : राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ ची भरती स्थगित

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ अंतर्गत घेण्यात आलेली भरती स्थगित

पोलीस उपमहानरीक्षक यांचे संबंधित प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश

भरती प्रक्रियेत खाजगी प्रकाशकाच्या प्रकाशन संस्थेतील सराव प्रश्नसंचातील तब्बल ८५ प्रश्न घेण्यात आले होते

अप्पर पोलीस महासंचालक यांनी पत्रक काढत भरती स्थगित करत असल्याची केली घोषणा

Thane : ठाण्यात बनावट इनव्हॉइसद्वारे विदेशी मद्य वाहतूक उघड; दोघांना अटक

औषधांच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस तयार करून परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून मोठी कारवाई

या कारवाईत तब्बल १ कोटी ६५ लाख ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

दोन आरोपींना अटक

Amravati : अमरावती शहर पोलिसांची कारवाई, बनावट साबण आणि डिटर्जंट पावडर जप्त

अमरावती शहर पोलिसांची आजवरची मोठी कारवाई; बनावट साबण आणि डिटर्जंट पावडरचा कारखाना उध्वस्त..

वलगाव परिसरातून ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त; नामांकित कंपन्यांच्या नावाने सुरू होता काळाबाजार...

गुन्हे शाखेच्या धाडीत ५ मशिनरींसह ४ आरोपी ताब्यात; शहरात बनावट मालाच्या विक्रीचे रॅकेट उघड...

बीडच्या कृषी प्रदर्शनात दक्षिण अमेरिकेतील साडेपाच फूट लांबीचा इग्वाना सरडा ठरतोय मुख्य आकर्षण

टँकर इंधन टंचाईचा फटका एस टी महामंडळाला

लातूर जिल्ह्यातील इंधन टंचाईचा फटका हा राज्य मार्ग परिवहन महामंडळ देखील बसला आहे, लातूर जिल्ह्यातील एकूण पाच आगारांपैकी केवळ लातूर आणि उदगीर या दोन आगारातूनच डिझेल पुरवठा करण्यात येतोय, तर अहमदपूर औसा, आणि निलंगा या आगारातील डिझेल पुरवठा हा पूर्णपणे बंद आहे

टँकर वेल्डिंग करताना स्फोट, एक कामगार गंभीर जखमी.

येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना टाकीत असलेल्या गॅसमुळे अचानक झालेल्या स्फोटात भाजल्यामुळे एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.

गडचिरोलीत अवकाळी पावसाची हजेरी; जनजीवनावर परिणाम

गडचिरोली जिल्ह्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे. काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने उकाड्यातून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी दैनंदिन कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात रस्ते ओले झाल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण असून काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नासरसापूर बालिका अत्याचार प्रकरणी येवल्यात निषेध

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद सर्वत्र उमटत असून नाशिकच्या येवला शहरातील परशुराम प्रतिष्ठान व अखिल भारतीय ब्राह्मण समाजा तर्फे काळ्या फिती लावत येवला तहसिल कार्यालयावर जात निषेध व्यक्त केला,यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीचे फोटो पायदळी तुडवत त्याला फाशी देण्याची मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले

दुहेरी मार्ग कामामुळे अहिल्यानगर–बीड रेल्वे सेवा १९ मेपर्यंत रद्द

अकोळनेर–अहिल्यानगर–निंबळक सेक्शनमध्ये सुरू असलेल्या दुहेरी मार्गाच्या कामामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ब्लॉक कालावधीत अहिल्यानगर स्टेशनवर फक्त अप आणि डाउन मेन लाईनच उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे गाडी क्र. ७१४४१ (अहिल्यानगर–बीड) आणि ७१४४२ (बीड–अहिल्यानगर) या सेवा ४ मे ते १९ मे २०२६ दरम्यान तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मालेगाव-मनमाड महामार्गावर टँकरची धडक; दोन्ही चालक गंभीर जखमी

मालेगाव-मनमाड महामार्गावर दहेगाव शिवारात गिडगे ढाब्या जवळ संध्याकाळी ५ वाजता ट्रक आणि BPCL इंधन टँकरमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना बाहेर काढले आणि मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकरणाचा तपास चांदवड पोलीस करत आहेत.

लासलगावमध्ये गॅस टाकीचा भीषण स्फोट

लासलगावच्या सोहन नगर परिसरात गॅस टाकीचा भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात पत्र्याच्या घराचे तसेच घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. स्फोट इतका तीव्र होता की परिसरात घबराट पसरली. सुदैवाने, घरातील पाच जण त्या वेळी झाडाखाली बसलेले असल्याने त्यांचे प्राण थोडक्यात वाचले. घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असून नुकसानाचा अंदाज घेतला जात आहे.

गडचिरोलीत अवकाळी पावसाची हजेरी; जनजीवनावर परिणाम

गडचिरोली जिल्ह्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे. काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने उकाड्यातून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी दैनंदिन कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात रस्ते ओले झाल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण असून काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भर उन्हात सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

भर उन्हात सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट....

तापत्या उन्हात अवकाळी पावसाचा थैमान....

धडगाव तालुक्यातील काकडदा, खामला, मक्ताझिरा झुंमटपरिसरात जोरदार गारपिट...

सातपुड्याच्या परिसरामध्ये गेल्या एक तासापासून वादळी वाऱ्यासह गारपीटी चा तडाखा....

अचानक आलेल्या पावसामुळे बाजार साठी आलेल्या नागरिकांची धावपळ....

सातपुड्यातील गावरान आंब्याचा हंगाम धोक्यात...

गारपिटीमुळे कैरी उत्पादनाला मोठा फटका...

सातपुड्यातील प्रसिद्ध आमचुल उद्योगाला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता.

वेंगुर्ल्यातील रेडी गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

अंगारकी संकष्टी निमित्ताने वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध रेडी गणपती मंदिरात आज भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सकाळी गणपतीची विधिवत पूजा व आरती झाल्यानंतर गणरायाच्या दर्शनाला भाविकांची सुरुवात करण्यात आली. आज मंगळवार असल्याने व अंगारिका योग आल्याने रेडीच्या प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी भावीकांनी गर्दी केली. नवसाला पावणारा अशी ख्याती असल्याने रेडीच्या गणपती चरणी अनेक जण नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत. जिल्ह्या बरोबरच गोवा राज्यातूनही हजारो भावीकांनी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.

Jalgaon: सोने -चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा

जळगाव -

सोने व चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा

गेल्या आठ दिवसात सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात सात हजार रुपयांची घसरण

आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलर मजबूत झाले असून मार्केट स्थिर झाल्याने सोने व चांदीच्या दरात घसरण

आज सोन 1700 रूपये नी घसले व चांदी 7000 हजार रुपये घसले

Pune: नसरापूर प्रकरणातील आरोपीचं वकिलपत्र घ्यायचं नाही, भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशनचा निर्णय

पुणे -

भोरमधील नसरापूर प्रकरणातील आरोपीचं कुणीही वकीलपत्र न घेण्याचा, भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशनचा निर्णय

अशा क्रूर गुन्हेगाराचं कुणीही वकीलपत्र घ्यायचं नाही असा भोर वकील संघटनेकडून करण्यात आला ठराव....

भोरनंतर पुण्यातल्याही वकील संघटने कडून हा निर्णय घेण्यातं आल्याची माहिती भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय उरुणकर यांनी दिलीय..

घडलेल्या क्रूर घटनेचा निषेध म्हणून भोर आणि पुणे बार असोसिएशन एकही वकील या घटनेतील आरोपीचं वकील पत्र स्विकारणार नाही हे वकील संघटनेमार्फत जाहीर करण्यात आलय..

त्याचबरोबर भोर वकील संघटनेतर्फे या क्रूर गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी.. यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं आणि फिर्यादीला वकील संघटनेमार्फत 100% मदत करण्यात येणारं असल्याचं जाहीर करण्यात आलाय.

Dharashiv:  पीक विम्याचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांचं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

धाराशिव -

धाराशिवमधील शेतकऱ्यांचे 5 हजार कोटी रुपये विमा कंपनीने अडवले

पीक विम्याचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

तांत्रिक चुका दाखवत कंपनीकडून शेतकऱ्यांची अडवणूक,

13 मे पर्यंत थकित विमा मिळाला नाही, तर रस्त्यावर उतरत आंदोलनाचा इशारा

Nanded: अतिक्रण काढताना पोलिस आणि अतिक्रमण धारकांमध्ये वाद

नांदेड -

अतिक्रण काढताना पोलिस आणि अतिक्रमण धारकांमध्ये वाद

पोलीसांचा जमावावर लाठीमार. नांदेड शाजारातील खडकपुरा वाघी रोड भागातील घटना.

अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान काल जमावाने जेसीबी चालकाला केली होती जबर मारहान.

Beed: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर बीडच्या परळी येथे भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

बीड-

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर बीडच्या परळी येथे भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केला विजयाचा जल्लोष!

Kolhapur: गोकुळ प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

कोल्हापूर -

गोकुळ प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा

आमदार पाटील यांची मागणी

जर काही केलं नसेल तर मंत्री मुश्रीफ घाबरत आहेत का, आमदार पाटील यांचा सवाल

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेते हे मुश्रीफ यांच्या दबावाखाली आहेत

जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज देण्यात आल्याने अनेक संस्था दबावाखाली म्हणूनच गोकुळ प्रशासकाला मुश्रीफ आणि काही नेत्यांचा विरोध आहे

शक्तीपीठ महामार्गामुळे विकास होणार असल्याने महामार्ग महत्त्वाचा, आमदार पाटील यांचे वक्तव्य

ओंकार साखर कारखान्याकडे चार महिन्यापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं बील थकीत

बीडच्या पांगरी येथील ओंकार साखर कारखाना युनिट क्रमांक 8 येथे आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची थकीत राहिलेल्या बिलासाठी कारखाना प्रशासनाला निवेदन दिले. गेली चार महिन्यापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ओमकार साखर कारखाना प्रा. लि.युनिट क्रमांक 8 ला ऊस घातला मात्र या उसाचे बिल न अद्याप कारखान्याने शेतकऱ्याला न दिल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचं दिसून आलं.

मनमाड-येवला महामार्गावर टँकरचा अपघात

मनमाडच्या पानेवाडी येथून इंधन भरून येवल्याच्या दिशेने जात असलेला टँकर तांदुळवाडी फाट्याजवळ टँकर उलटला. टँकर उलटल्यानंतर त्यातून इंधन गळती झाली सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी टँकर मधील सर्व इंधन मात्र गळती झाले.टँकर रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत पलटी झाल्याने या मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती.

पंढरपुरात नियमीत वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

नियमित विज पुरवठ्याच्या मागणीसाठी पंढरपुरतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतीला नियमीत वीजपुरवठा द्यावा या मागणीसाठी आज पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शेतकऱ्यांनी येथील वीज उपकेंद्रा समोर आंदोलन केले.

मागील काही दिवसांपासून शेती आणि घरगुती विज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरळीत विज पुरवठा होत नसल्याने शेती पीके पाण्याअभावी जळू लागले आहेत. नियमीत आणि उच्च दाबाने वीज पुरवठा करावा‌ यामागणीसाठी शेतकऱ्यांना विज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन केले.

पंढरपूरच्या कॉरिडॉरला मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीची मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मागील दोन वर्षापासून चर्चेत असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीने मान्यता दिली आहे.

30 महिन्यामध्ये काम पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

मात्र कॉरिडॉर बाधितांनी अजूनही विरोध कायम ठेवला आहे. तर भाविक व वारकऱ्यांनी मात्र मुख्यमंत्र्यांचे आभार मानत कॉरिडॉरचे स्वागत केले आहे.

पुण्यातील आंबेगाव पठार भागात दगडाने ठेचून एकाची हत्या

आंबेगाव पठार परिसरात पोलिंसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पुण्यात किरकोळ कारणावरून हत्येची घटना घडली होती. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत नयन जाधव याची धारधार शस्त्राने हत्या झाली. कोयता आणि फेव्हर ब्लॉक डोक्यात घालून हत्या झाली.

मुरबाड माळशेज महामार्गावर भीषण अपघात 

मुरबाड माळशेज घाट महामार्गावरील वैशाखरे वळणावर एसटी बस आणि कार यांच्यात समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून या अपघातात एक पुरुष एक महीला जागीच ठार झालीय, तर लहान मुलासह पाचजण गंभीर झाले आहेत. कल्याण आहील्यानगर वैशाखरे वळणावर कल्याण-नगर एसटी बस आणि स्कॉर्पिओ कार यांच्यामध्ये ओवरटेक करताना हा अपघात झालाय. जखमींवर मुराबडच्या टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी टोकावडे महामार्ग पोलिस पोहचले असून पुढील तपास करत आहेत.

नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; तरुणाची केली लाखोंची फसवणूक 

बातमीय बीड मधून बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावणारी टोळी सक्रिय झाली असून या अगोदर ही ग्रामीण भागातील अनेक तरुणांची फसवणूक या बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने केली आहे. मात्र असाच प्रकार बीडच्या उमापूर गावातून समोर आला असून नवरी एक अन् नवरदेव अनेक असे म्हणण्याची वेळ नवरदेवावर आली आहे.उमापूर येथील एका युवकाची बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने लाखो रुपयांची फसवणूक केली आहे एकाच मुलीचे अगोदर आठ नवरदेवा सोबत लग्न लावण्यात आले मात्र पैशासाठी पुन्हा उमापूर येथील नवव्या नवरदेवा सोबत एजंट लग्न लावून दिले आणि लाखो रुपयांची फसवणूक केली आहे याप्रकरणी बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पीडित नवरदेवाने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन माझी लाखो रुपयांची फसवणूक झाली.

चंद्रभागा स्नानासाठी गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू

विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलाचा चंद्रभागा नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. शिवराज गणेश इधाटे ( वय 17, रा.चांदईएको ता.भोकरदन जि. जालना) बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. शिवराज आपल्या आईवडीलांसह विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आला होता. आज सकाळी आईवडीलासोबत तो चंद्रभागा नदीवर स्नानासाठी गेला होता. दरम्यान खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला. स्थानिक कोळी बांधवांच्या मदतीने शिवराजला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डाॅक्टरांनी त्याला मृतघोषीत केले. एकाच आठवड्यात नदीपात्रात भाविक बुडाल्याची दुसरी घटना घडली आहे. चार दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील एका भाविकाचा नदीत बुडल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा घटना घडली आहे‌. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

जनगणनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर चा अर्ज फेक, जिल्हा प्रशासनाची माहिती 

जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.आणि हा अर्ज बनावट आणि अनधिकृत असून,बँक डिटेल्स जनगणनेत कुठेच भरले जात नाही त्यामुळे हा फॉर्म फेक असल्याची माहिती वाशीमच्या जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

कर्स लॉन्ज कॅफेतील अत्याचार प्रकरणामध्ये आयटी ऍक्टची वाढ 

आरोपीच्या मोबाईलमधील व्हिडीओमुळे गुन्ह्याचा व्याप वाढला आहे. माजलगाव शहरातील 'बेकर्स लॉन्ज कॅफे' मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाला आता नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणातील विधिसंघर्ष बालक असलेल्या आरोपीच्या मोबाईलमध्ये पीडितेचे अश्लील व्हिडीओ आढळून आल्याने खळबळ उडाली असून, गुन्ह्यात आयटी क्टची कलमे वाढवण्यात आली आहेत.

Dombivli: डोंबिवलीत धक्कादायक घटना, तीन लहान मुलांना रस्त्यावर सोडून आई बेपत्ता,पोलिसांचा शोध सुरू 

डोंबिवली पश्चिमेतील तुळशीराम बंगल्याजवळ सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. खाऊ आणायला जाते असे सांगून गेलेली आई आपल्या तीन लहान मुलांना रस्त्यावरच सोडून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

Washim: वाशिमच्या जऊळका येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

वाशिमच्या जऊळका येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला झाला आहे. यामध्ये 7 महिला 2 पुरुषांना कुत्र्याने चावा घेतला. जखमींना तातडीने मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

झाडाचे आंबे तोडले म्हणून 15 वर्षीय मुलाला अमानुष मारहाण

आपल्या झाडाचे आंबे तोडले म्हणून एका दाम्पत्याने 15 वर्षीय मुलाला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना बदलापूरमध्ये घडलीये. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खामगाव शहरात खळबळ,  कौटुंबिक वादातून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न 

खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द परिसरात एका व्यक्तीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. याबाबत किशोर चोपडे यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती .. त्यांच्या तक्रारीवरून पांडुरंग बोचरे, अजय बोचरे, गोपाल बोचरे सर्व राहणार सुटाळा खुर्द तसेच दिपाली किशोर चोपडे राहणार सुटाळपुरा खामगाव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द परिसरात एका व्यक्तीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. याबाबत किशोर चोपडे यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती .. त्यांच्या तक्रारीवरून पांडुरंग बोचरे, अजय बोचरे, गोपाल बोचरे सर्व राहणार सुटाळा खुर्द तसेच दिपाली किशोर चोपडे राहणार सुटाळपुरा खामगाव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहेमुखईकरांनी अनुभवला बिबट्याचा थरार, वनविभागाच्या तत्पर कारवाईत एक तासात बिबट्या जेरबंद

शिरूर तालुक्यातील मुखई येथील निलख वस्तीत बिबट्याचा थरार पाहायला मिळाला, रात्री उशिरा मुक्त खुराड्यात बिबट्या शिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सुमारे एका तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद केले. दरम्यान, बिबट्याने डरकाळ्या फोडत शेजारील आंब्याच्या झाडावर उड्या मारल्याने नागरिकांनी दीड तास थरार अनुभवला.जेरबंद करण्यात आलेला बिबट्या अंदाजे दोन वर्षांचा मादी असून त्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.वनविभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Maharashtra News Live Update : कामशेत येथे उड्डाणपूलावर कारला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत येथील मशीदसमोरील उड्डाणपूलावर मुबईहुन पुणे च्या दिशेने एका कारला भीषण आग लागून एक व्यक्ती जळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे.

रायगडच्या कर्जतमध्ये मोठी राजकिय घडामोड

रायगडच्या कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत उभावाद सुरु होता. हा वाद क्षमल्याची चिन्ह दिसत आहेत. तसे सुतोवाच शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्याने रायगडमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधान सभा निवडणूक आधीपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात राजकीय वाद सुरु आहेत. विधान सभा निवडणुकीत तटकरे यांनी पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप थोरवे यांनी वारंवार केला होता. तर थोरवे यांचे प्रतिस्पर्धी सुधाकर घारे यांना राष्ट्रवादीत घेत जिल्हाध्यक्ष करून ताकद देत तटकरे यांनी थोरवे यांच्या समोर आव्हान उभे केले होते. याचा थेट फटका थोरवे यांना नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत बसला. थोरवे आणि तटकरे म्हणजे रायगडमधील शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील वाद संपला असून एकत्र काम करणार असल्याचे आ. थोरवे यांना प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतील सांगितल. आता रायगडच्या राजकारणात नक्की काय उलथापालथ होते हे पहाण महत्वाच ठरणार आहे.

पंढरपुरात गवळी समाजाकडून 14 जोडप्यांचे सामुदायिक विवाह..

वीरशैव लिंगायत गवळी समाज तरुण मंडळाच्या वतीने पंढरपुरात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 14 जोडप्यांचा सामुदायिक विवाह एकाच मांडवात गवळी समाजाकडून करून देण्यात आला. महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश येथील वधू - वरांचा विवाह सोहळा झाला. पंढरपुरात संत तनपुरे महाराज मठात विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. मोठ्या व अवास्तव खर्चाला फाटा देऊन सामुदायिकरित्या गवळी समाजाच्या वतीने विवाह सोहळे करून एकात्मतेचे दर्शन घडवले

समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लुटणारी आंतरराज्य दरोडेखोरांची टोळी जेरबंद

समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लक्ष करणारी एक आठ दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या अथक प्रयत्नांनी जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाल आहे. दोन मे रोजी नागपूरहून गुजरात कडे जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या कारला अडवून व्यापाऱ्याला मारहाण करत त्याच्याकडील बारा लाख रुपयांची रोकड या आंतरराज्य टोळीने पळवली होती बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांनी स्वतः बीड जिल्ह्यात जाऊन या टोळीला जेरबंद केलं . या टोळीत उत्तर प्रदेश, जम्मू कश्मीर, कर्नाटक, उत्तर प्रदेश व गुजरात या राज्यातील दरोडेखोरांचा सहभाग होता. टोल नाका परिसरात जाणाऱ्या वाहनांवर लक्ष निश्चित करत हे दरोडेखोर समृद्धी महामार्गावर वाहन अडवून प्रवाशांना मारहाण करत त्यांना जंगलात सोडून रोकड किंवा ऐवज लांबवत असत. या टोळीकडून 13 लाख रुपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला...

अंगारकी चतुर्थी निमित्त लाखो भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी राजुरमध्ये दाखल

अंगारकी चतुर्थी निमित्त जालन्यातील राजुर येथे भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे अंगारकी चतुर्थी निमित्त लाखो भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी राजूरमध्ये दाखल झाले आहेत. आज तब्बल 12 लाख भाविक राजुरेश्वराचे दर्शन घेणार आहेत.महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून राजुरेश्वरांच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. त्यामुळे गर्दी लक्षात घेऊन भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनातर्फे विविध उपायोजना राबविण्यात आल्या असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे,

- एका महिला कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू  

नागपूर एसबीएल कंपनीत 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटातील आणखी एका महिला कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय

- दुर्गा घाडगे व 33 वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे

- त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता 27 वर पोहोचली आहे

- नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील रावळगाव येथील एसबीएल कंपनीत एक मार्च रोजी भीषण स्फोट झाला होता

- त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून दुर्गा घाडगे यांची मृत्यूशी झुंज सुरू होती

सोलापूर - बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाचजणांना पोलिस कोठडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील पाच आरोपींना अटक करून त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.या आरोपींना ८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मृत गायत्री मस्के यांचे बंधू दिलीप चांदोरे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा मंगळवार (ता. ५) उपलब्ध करून देण्यात येत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरता येणार आहेत.

भिवंडीत निसर्गाचा चमत्कार आंब्याच्या झाडाला आले सीताफळ, नागरिकांमध्ये आश्चर्य

भिवंडी तालुक्यातील साईगाव येथे निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळत असून, येथील एका आंब्याच्या झाडाला चक्क सीताफळ लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्मिळ घटनेमुळे परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

विद्युत विभागाची लोडशेडिंग ज्येष्ठ नागरिकांचा उष्णतेने जीव धोक्यात

सध्या हिंगोलीत ग्रामीण भागात वीज वितरण विभागाने सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत विजेच्या लोड शेडिंग जाहीर केली आहे याचा थेट परिणाम गावात कितपत पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे, दिवसभर झाडाच्या सावलीत राहणारे हे जेष्ठ नागरिक सायंकाळी झोपण्यासाठी घरात आल्यानंतर उष्णतेने हैराण होत आहेत तर दिवसभर शेतात काम करून आलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील याचा त्रास होतोय त्यामुळे विद्युत विभागाने नियमांमध्ये बदल करण्याची मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आहे

अंगारकी संकष्टी निमित्त गणपतीपुळे मंदिरात गर्दी

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे मंदिरात भाविकांमी गर्दी केलीय. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भाविक गणपतीपुळ्यात दाखल झालेत. मे महिन्यात अंगारकी आल्यामुळे यंदा गणपतीपुळ्यात दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या ही 70 ते 80 हजारच्या घरात असेल असा अंदाज गणपतीपुळे देवस्थानाने वर्तवला आहे.

लातूरमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, पंपावर वाहनांच्या रांगा

लातूर जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे ,जिल्ह्यातला काही पेट्रोल पंपावर एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत, तर अनेक पेट्रोल पंप बंद अवस्थेत आहेत, अचानक पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांनी इंधनासाठी मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर लावले आहेत.

अक्षय कर्डिले विजय झाल्यानंतर आमदार म्हणून घरात पाऊल ठेवल्यानंतर कुटुंबात भावनिक वातावरण

राहुरी पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा एक लाखांपेक्षा अधिक मदत मताधिक्याने विजय झाला दुपारपासूनच संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन रात्री उशिरा अक्षय कर्डिले हे घरी पोहोचल्यानंतर अत्यंत भावनिक असे वातावरण निर्माण झाले होते.स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती त्या जागेवर अक्षय कर्डिले यांनी मोठ्या फरकाने विजय मिळाला असला तरी वडिलांच्या जागेवर मिळवलेला विजय आणि दुसरीकडे वडील गमावल्याचे दुःख एकाच वेळी असल्याने घरी आल्यानंतर अक्षय कर्डिले यांना आपल्या आईसमोर अश्रू अनावर झाले आपल्या स्वर्गीय वडिलांच्या आठवणीने संपूर्ण कुटुंबीय भावनिक झाले होते. एकीकडे मुलगा जिंकण्याची खुशी तर दुसरीकडे पती गमावल्याचे दुःख अक्षय कर्डीले यांच्या आईला होते त्यामुळे दोघांनीही अश्रुला मोकळी वाट करून दिली हा भावनिक क्षण अत्यंत वेदनादायक असा होता.

nashik-malegaon-परीक्षार्थी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, साहाय्यक प्राध्यापकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिकच्या मालेगाव मधिल एका नामांकित कॉलेज मध्ये धक्का दायक घटना घडली असून,परिक्षार्थी विद्यार्थीनी कडे एका सहाय्यक प्राध्यापकाने शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पेपरसाठी संशयीत प्राध्यापकाची एका वर्गावर पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पेपर संपल्याने दुपारी १२ वाजेपूर्वी वर्गातील इतर सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर निघून गेले होते. मात्र, तक्रारदार विद्यार्थिनीचा पेपर पूर्ण व्हायचा बाकी असल्याने ती वर्गात शेवटपर्यंत बसून पेपर लिहित होती. यावेळी वर्गात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत संशयित प्राध्यापकाने या विद्यार्थिनीजवळ जाऊन तिच्याकडे अश्लील मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महाविद्यालयीन व संबंधित संस्थेच्या प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून साहाय्यक प्राध्यापक वाजिद अली यास तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई केली आहे.तर हिंदुत्ववादी संघटनांच्या कानावर हे वृत्त जाताच त्यांनी मालेगाव कॅम्प पोलिसात धाव घेत या प्राध्यापकावर कठोर कारवाईची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com