Gratuity Calculator Saam Tv
बिझनेस

Gratuity Calculator: ५ वर्षांआधीच नोकरी सोडली? तरीही तुम्हाला मिळेल ग्रॅच्युइटी, कसे कराल कॅल्क्युलेशन?

Gratuity: नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळते. पण त्या कर्मचाऱ्याने कंपनीत किंवा संस्थेमध्ये ५ वर्षे काम केलेले असणे आवश्यक आहे. पण जरी तुम्ही ५ वर्षे पूर्ण केले नसले तरी देखील तुम्हाला ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल ती कशी घ्या जाणून....

Priya More

नोकरी सोडताना किंवा रिटायर झाल्यावर कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या एकरकमी रकमेला ग्रॅच्युइटी म्हणतात. ग्रॅच्युइटी पेमेंट नियम १९७२ नुसार कोणत्याही कंपनी किंवा संस्थेत ५ वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचारी ग्रॅच्युइटी मिळविण्याचा हक्कदार बनतो. पण अनेक कंपन्या अश आहेत ज्याठिकाणी जर कर्मचाऱ्याला ५ वर्षे पूर्ण झाली नसतील तर त्याला नोकरी सोडल्यानंतर ग्रॅच्युटीचे पैसे दिले जात नाही. पण तुम्हाला हे माहिती आहे का ५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी जरी तुम्ही नोकरी सोडली तर तुम्हाला ग्रॅच्युइटीचे पैसे मिळू शकतात. कसे ते आपण जाणून घेणार आहोत...

५ वर्षापूर्वीही तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळू शकते. जर तुम्ही एखाद्या कंपनी किंवा संस्थेत ४ वर्षे २४० दिवस पूर्ण केले असतील तर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र असू शकता. म्हणून नोकरी सोडण्यापूर्वी तुम्ही तुमचा सेवा कालावधी मोजला पाहिजे. समजा जर तुमची कंपनी ग्रॅच्युइटी देण्यास नकार देत असेल तर तुम्ही कामगार विभाग किंवा न्यायालयात तुमची तक्रार दाखल करू शकता.

तज्ञांच्या मते, जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत ४ वर्षे २४० दिवस पूर्ण केले तर तो ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र आहे. सांगायचे झाले तर, जर एखादा कर्मचारी १ जानेवारी २०२१ रोजी कंपनीत कामासाठी रुजू झाला. तर तो २९ ऑगस्ट २०२५ रोजी राजीनामा दिल्यानंतरही ग्रॅच्युइटी घेऊ शकतो. जरी त्याला कंपनीत ५ वर्षे पूर्ण झाली नसली तरी त्याला ग्रॅच्युटी मिळू शकते. कंपनीत ४ वर्षे २४० दिवस काम केले असल्यामुळे या कर्मचाऱ्याला त्याची ग्रॅच्युटी मिळते.

जर तुम्हाला नोकरी सोडल्यावर ग्रॅच्युइटी मिळवायची असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की कंपनीत तुमचा कामाचा कालावधी किमान ४ वर्षे ८ महिने पूर्ण झालेला असावा. त्यानंतरच तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र असाल. म्हणजेच ४ वर्षे २४० दिवसांपेक्षा कमी सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार नाही. महत्वाचे म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ५ वर्षांची सेवा आवश्यक नाही.

जर एखाद्या कर्मचाऱ्याने पाचव्या वर्षी २४० दिवस पूर्ण केले असतील तर ती ५ वर्षांची पूर्ण सेवा मानली जाईल आणि त्याला ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जाईल. ग्रॅच्युइटी भरणे करमुक्त आहे. परंतु सरकारने त्यासाठी एक मर्यादा निश्चित केली आहे. नियमांनुसार, २० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त आहे. याचाच अर्थ जर एखाद्याला यापेक्षा जास्त ग्रॅच्युइटी मिळाली तर कर्मचाऱ्याला २० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर कर भरावा लागू शकतो.

ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते?

ग्रॅच्युइटी कॅल्क्युलेशन फॉर्म्युला (१५ x शेवटचा पगार x सेवा कालावधी) / २६ असा आहे. या द्वारे तुम्हाला ग्रॅच्युटीची रक्कम दिली जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार ४५,००० रुपये असेल आणि त्याने कंपनीत ४ वर्षे २९० दिवस काम केले असेल. जे ५ वर्षांच्या समतुल्य मानले जाईल. तर सूत्रानुसार त्याची ग्रॅच्युइटी १,२९,८०८ रुपये असेल. म्हणजेच (१५ X ४५,००० X ५)/२६ = १,२९,८०८ रुपये इतकी ग्रॅच्युटी रक्कम त्या कर्मचाऱ्याला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pathnatya History: पथनाट्यांची सुरुवात कशी झाली? इतिहास जाणून घ्या

Maharashtra Live News Update: भरधाव कार ने पिकअप ला दिली धडक, दोन जण गंभीर जखमी..

Politics : एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत; दीड तास PM मोदींसोबत बैठक; काय झाली चर्चा?

Rohit Sharma: निवृत्तीच्या चर्चेदरम्यान रोहितचं वादळ; ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धुतलं, झळकावलं ३३ वं शतक

वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात आलेल्या २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा विनयभंग, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT