Gratuity Rule: कर्मचाऱ्याने कंपनीत ५ वर्षे पूर्ण न केल्यासही मिळू शकते ग्रॅच्युइटी, जाणून घ्या नियम

Gratuity Rule For Employee: प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी म्हणून मोठा निधी मिळतो. एखाद्या कर्मचाऱ्याने त्या कंपनीत किमान ५ वर्ष नोकरी पूर्ण केली पाहिजे.
Gratuity Rule
Gratuity RuleGoogle

प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी म्हणून मोठा निधी मिळतो. एखाद्या कर्मचाऱ्याने त्या कंपनीत किमान ५ वर्ष नोकरी पूर्ण केली पाहिजे. परंतु आता जर एखाद्या व्यक्तीने काही कारणात्सव नोकरीचा राजीनामा दिला तरीही त्याला ग्रॅच्युइटीचा निधी मिळतो. यासंबंधित काही नियम आहेत ते जाणून देऊयात.

ग्रॅच्युइटीसंबंधित तरतुदी ग्रॅच्युइटी कायदा १९७२ मध्ये समाविष्ट केल्या आहेत. या कायद्यानुसार जर एखाद्या कंपनीत कर्मचाऱ्याने ५ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडली तरी त्याला ग्रॅच्युइटी मिळू शकते. जर एखाद्या व्यक्तीने पाच वर्ष पूर्ण होण्याआधी राजीनामा दिला तर तो व्यक्ती ग्रॅच्युइटी कायद्यानुसार ग्रॅच्युइटीसाठी दावा करु शकतात.

ग्रॅच्युइटी ही तीन गोष्टींवर अवलंबून असते. ग्रॅच्युइटी कायद्यानुसार, कर्मचाऱ्याने किमान ५ वर्ष पूर्ण केलेली असावी. जर एखाद्या कंपनीमध्ये ५ दिवस काम करण्याचा नियम असेल तर तो कर्मचारी ४ वर्ष १९० दिवस काम पूर्ण केल्यानंतर ग्रॅच्युइटीचा दावा करु शकतात. जर कंपनीत ६ दिवस काम करण्याचा नियम असेल तर त्या कर्मचाऱ्याला कंपनीत ४ वर्ष २४० दिवस काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळेल.

Gratuity Rule
Elon Musk: X युझर्ससाठी मोठी बातमी! आता X वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार, एलॉन मस्कने सांगितलं कारण

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, वकील आदित्य चोप्रा यांनी ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम 4 (2) चे काही मुख्य मुद्दे स्पष्ट केले आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत ४ वर्ष ६ महिने काम केले असेल तर तो कर्मचारी ग्रॅच्युइटी पेमेंटचा हक्कदार असेल. याशिवाय काही विशेष परिस्थितीमध्ये म्हणजे कर्मचाऱ्याचा मृत्यू, आजार किंवा अपघातामुळे अंपगत्व या परिस्थिती किमान वेळ पूर्ण करण्याची अट लागू होत नाही.

Gratuity Rule
Iran-Israel: इस्रायल-इराण युद्धात शेअर बाजार होरपळला, श्रीमंतांनी गमावले कोट्यवधी रुपये; सर्वाधिक नुकसान कोणाचे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com