Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण, निवडणूक आयोगाने दिली माहिती

Election Commissioner of India: येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण, निवडणूक आयोगाने दिली माहिती
Election Commission of IndiaSaam Tv
Published On

>> हिरा ढाकणे

Lok Sabha Elections 2024:

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. जळगावमध्ये २२, पुण्यामध्ये २१, ठाण्यामध्ये १८ आणि नाशिकमध्ये १५ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. अकोला, कोल्हापूर, लातूर, पालघर, परभणी, रायगड या ६ जिल्ह्यांत प्रत्येकी १ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहे. गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र नसेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण, निवडणूक आयोगाने दिली माहिती
Jayant Patil: भाजपसह शिंदे आणि अजित पवार गट देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, जयंत पाटील यांचा आरोप

या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण ६,०४,१४५ इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्केपेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.  (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण, निवडणूक आयोगाने दिली माहिती
MNS News: मनसे महायुतीत सहभागी होणार का? शर्मिला ठाकरे यांचं नाव घेत राजू पाटील म्हणाले...

दिव्यांग मतदारांसाठी (PwDs) ‘सक्षम’ॲप

भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने ‘सक्षम’ हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातुन तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस ६,०४,१४५ इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com