Paytm, GPay saam tv
बिझनेस

Paytm, GPay करताना वेगळ्याच अकाउंटला पैसे गेले? टेन्शन सोडा फक्त 'हे' काम करा, झटक्यात पैसे मिळतील परत

How can I Get Refund From A Wrong UPI Transaction : UPI वापरून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील, तर घाबरू नका. तुम्ही NPCI पोर्टलवर तक्रार दाखल करून पैसे परत मिळवू शकता. संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या.

Shreya Maskar

आजकाल सर्वत्र Digital Payments केले जाते.

अनेक वेळा UPI च्या माध्यमातून पैसे पाठवताना चुकीचे ट्रान्झॅक्शन होते.

चुकीच्या खात्यात गेलेले पैसे तुम्ही पुन्हा (Refund) मिळवू शकता.

आजकाल आपण लहान-मोठ्या खर्चासाठी UPI वापरत आहोत. PhonePe, Google Pay आणि BHIM यासारख्या ॲप्सचा वापर करतो. यामुळे पैशांची देवाणघेवाण सोपी आणि जलद झाली आहे. मात्र कधीतरी घाईगडबडीत आणि एका छोट्या चुकीमुळे पैसे चुकीच्या खात्यात जातात. अशावेळी घाबरून न जाता आणि टेन्शन न घेता, तक्रार करा. तुमचे पैसे तुम्हाला मिळतील.

तुमचे पैसे जर चुकीच्या बँक खात्यात गेले असेल तर तुम्ही ताबडतोब NPCI पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता. तुम्ही तुमच्या बँकेद्वारे किंवा हेल्पलाइन नंबरद्वारे देखील मदत घेऊ शकता. तक्रार केल्यानंतर ४८ तासांच्या आत कारवाई सुरू केली जाते, ज्यामुळे तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. सर्वात आधी बँकेशी संपर्क साधा आणि व्यवहाराचे योग्य तपशील घ्या. त्यानंतर त्वरित तक्रार दाखल करा. मात्र कायम लक्षात ठेवा की, पैसे पाठवण्यापूर्वी UPI आयडी किंवा मोबाईल नंबर पुन्हा तपासा.

NPCI पोर्टलवर तक्रार कशी करावी?

तुम्ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर चुकीच्या व्यवहाराबद्दल तक्रार दाखल करू शकता.

  • पायरी १- सर्वप्रथम https://www.npci.org.in/ उघडा.

  • पायरी २- UPI Dispute / Complaint (यूपीआय विवाद / तक्रार) या पर्यायावर क्लिक करा.

  • पायरी ३ - यानंतर, तुमचा यूपीआय संदर्भ क्रमांक (UPI Reference Number) आणि व्यवहाराचा तपशील (transaction details) टाका.

  • पायरी ४- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. शेवटी, तक्रार सबमिट करा.

हेल्पलाइन नंबरवर तक्रार दाखल करा

तुम्ही हेल्पलाइन नंबरच्या मदतीने देखील तक्रार दाखल करू शकता. यूपीआय-संबंधित समस्यांसाठी, तुम्ही 1800-120-1740 या क्रमांकावर कॉल करून तक्रार दाखल करू शकता. हा क्रमांक टोल-फ्री आहे.जेव्हाही तुम्ही डिजिटल पेमेंट करता, तेव्हा त्याच्याशी संबंधित एसएमएस आणि व्यवहाराचा तपशील जपून ठेवा. जर काही समस्या उद्भवली, तर तक्रार दाखल करताना आणि तपासाच्या वेळी ही माहिती उपयुक्त ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT