नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सिलिंडरच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच केंद्र सरकार पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या किमती कमी करणार आहे.
पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारतात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्र सरकारने LPG ग्राहकांना मोठा दिलासा देऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिंटमध्ये प्रसिद्ध प्रकाशित झालेल्या बातमीनुसार सरकार गॅस (Gas) सिलिंडरवरील सबसिडी वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारने पंतप्रधान उज्जवला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरच्या अनुदानात वाढ जाहीर करणे अपेक्षित आहे. या योजनेच्या रकमेत वाढ झाल्याने करोडो गॅस ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
उज्जवल योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहक संख्या वाढवण्यावरही सरकार भर देत आहे. वाढत्या महागाईला आळा बसवण्यासाठी सरकारने (Governments) महत्त्वाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर ५.०२ टक्क्यांवर घसरला आहे.
सरकारने आरबीआयला (RBI) महागाई दर ४ ते ६ टक्क्यां दरम्यान ठेवण्याचे लक्ष्य दिले आहे. यापूर्वी जुलैमध्ये महागाईचा दर १५ महिन्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.
1. LPG सिलिंडरची किमत किती होऊ शकते?
सध्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात १२ सिलिंडरवर ३०० रुपये प्रति सिलिंडर सबसिडी मिळते. दिल्लीमध्ये १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ९०३ रुपये आहे. अनुदानाचा लाभ मिळाल्यानंतर सिलिंडरचा भाव ६०३ रुपयांना मिळेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे ९.६ कोटी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गॅस सबसिडीवर दिलासा दिला होता. सरकारने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी एलपीजी सबसिडी २०० रुपयांवरुन ३०० रुपये प्रति सिलिंडर केला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
उज्जवला योजनेअंतर्गत सरकारने सुमारे ७५ लाख घरगुती गॅस कनेक्शनला मंजुरी दिली आहे. यानंतर लाभार्थ्यांची संख्या १० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता देखील सांगितली आहे. ऑक्टोबरमध्ये अनुदानाच्या रकमेत १०० रुपयांची वाढ केल्यानंतर, लाभार्थींनी पूर्वी १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी अनुदान मिळाल्यानंतर ७०३ रुपये मोजावे लागत होते. परंतु, अनुदानानंतर २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढल्यानंतर आता या सिलेंडरची किंमत ६०३ रुपये इतकी आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.