West Bengal Annapurna Bhandar Scheme google
बिझनेस

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

West Bengal Annapurna Bhandar Scheme: आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सरकार नेहमीच मदत करत असतं. त्यातच महिलांना दरमहा ३००० रुपयांची येत्या जूनपासून आर्थिक मदत मिळणार आहे.

Saam Tv

सध्याच्या वाढत्या महागाईमुळे महिलांना खूप हालाखीच्या परिस्थित राहावं लागतं. ज्यांचे वार्षिक उत्पन्न किंवा मासिक पगार हा खूप कमी आहे, त्यांना कुटुंब चालणवणं फारच अवघड झालं आहे. याचाच विचार करून मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये लाडक्या बहिणींना दरमहा ३००० रुपये दिले जाणार आहेत.

कधी येणार पहिला हप्ता?

पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी ही दिलासादायक बातमी आहे. अन्नपूर्णा भंडार योजना या खास योजनेमध्ये पश्चिम बंगालमधील नागरिकांना दरमहा म्हणजे येत्या १ जूनपासून महिलांना दरमहा ३००० रुपये मिळतील अशी आनंदाची घोषणा केली आहे. हे पैसे थेट खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस सेवेचाही लाभ घेता येणार आहे.

कोणत्या महिला पात्र ठरतील?

अन्नपूर्णा भंडार योजनेचा लाभ हा पश्चिम बंगालमधल्या रहिवाशी महिलांनाच घेता येईल. तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यात वार्षित उत्पन्न कमी असायला हवे, वय २५ वर्षांपेक्षा जास्त आणि महत्वाचं म्हणजे, रेशन कार्डात महिलेचं नाव असणं गरजेचं आहे.

अन्नपूर्णा भंडार योजनेसाठी अर्ज कसा करावा?

सध्या अन्नपूर्णा भंडार योजनेच्या अर्जाची सुरुवात करण्यात आलेली नाही. पण तुम्हाला जूनपासूनचे हप्ते एकत्र दिले जातील. या योजनेचे अधिकृत पोर्टल लॉन्च केल्यावर पात्र महिला त्यांचा मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड टाकून नोंदणी करू शकू शकतात. याचे हप्ते दरमहा खात्यात जमा झाल्याने आर्थिक भार नक्कीच कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

मुंबईतील ७९ नगरसेवकांचं पद जाणार? निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपाने खळबळ

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

SCROLL FOR NEXT