केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

Ketan Agarwal Killed Case Digital Evidence Lohagad Recreation: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी सियाला लोहगडावरील घटनास्थळी नेत 'सीन रिक्रिएशन'देखील केलंय. त्यामुळे या प्रकरणात पोलीस तपासाची चक्रं वेगानं फिरताहेत. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट....
Police recreate the crime scene at Lohagad Fort as digital evidence reveals chilling details in the Ketan Agarwal murder case.
Police recreate the crime scene at Lohagad Fort as digital evidence reveals chilling details in the Ketan Agarwal murder case.saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सियानं केतनच्या हत्येचा कट कसा रचला याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आलीये. इतकंच नव्हे तर केतनला मारण्यासाठी गुगल आणि युट्युबवरील व्हिडिओचा आधार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. केतनला मारण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यासही केला होता... त्यासाठी सिया आणि तिचा साथीदार चेतननं हत्या कशी करायची याचा सराव करून मग केतनची हत्या केली, अशी धक्कादायक बाब आता तपासातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

सियानं कसा रचला हत्येचा कट?

- गुगल आणि युट्युबवर दोघांनी हत्येचे वेगवेगळे व्हिडिओ पाहून कट रचला

- लोहगडावरील कोणत्या ठिकाणाहून ढकलल्यावर अपघात वाटेल याचा अभ्यास केला

- केतनला विष देऊन मारता येईल का? याचीही चाचपणी केली

- पोलिसांपासून बचाव कसा करता येईल? याचीही माहिती गुगलवर शोधली

- संपूर्ण घटना अपघातासारखी कशी भासवायची याबाबतही दोघांनी माहिती काढली

- घटनेआधी लोहगडावर जाऊन धक्का कसा द्यायचा, हत्या कशी करायची याचा सराव केला

दुसरीकडे, लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन करण्यात आलंय. ज्याठिकाणाहून सियानं केतनला गडावरून ढकलून दिलं, त्याच ठिकाणी पोलीस सियाला घेऊन गेले. घटनास्थळी नक्की काय झालं? याचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

खरंतर, केतनच्या हत्या प्रकरणात तपासाची चक्रे वेगवान फिरली आहेत. पोलिसांनी केतनच्या लाल रंगाच्या इलेक्ट्रिक कारची तपासणी सुरू केलीये. हत्येच्या दिवशी केतन आणि सिया याच कारमधून लोहगड किल्ल्यावर गेले होते. इतकंच नव्हे तर सिया आणि चेतनच्या नात्याचे धक्कादायक पैलूदेखील समोर आले आहेत. तर दुसरीकडे गोयल कुटुंबाला चेतन आणि सियाच्या प्रेमसंबंधाचा संशय आल्यानं सियाचं लग्न घाईघाईने अवघ्या विसाव्या वर्षी ठरवण्यात आलं होतं, अशीही धक्कादायक माहिती सूत्रांनी दिलीये. प्रियकरासाठी केतनला आपल्या मार्गातून क्रूरपणे हटवणाऱ्या सियाचा पाय दिवसेंदिवस खोलात चाललाय. मात्र यापुढे गोयल कुटुंबातील सदस्यांच्या चौकशीतूनही काय सत्य समोर येतंय ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com