Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

स्प्रिंग रोल शीट्स, बारीक चिरलेला कोबी, गाजर, ढोबळी मिरची, कांद्याची पात, लसूण, मिरीपूड, सोया सॉस, चिली सॉस, मीठ, तेल आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट.

Paneer Spring Roll

भाज्यांचे स्टफिंग तयार करा

कढईत थोडे तेल गरम करून त्यात लसूण परतून घ्या. त्यानंतर कोबी, गाजर, ढोबळी मिरची आणि कांद्याची पात घालून २-३ मिनिटे परता. त्यात मीठ, मिरीपूड, सोया सॉस आणि चिली सॉस घालून मिश्रण थंड होऊ द्या.

Veg Spring Roll Recipe

स्प्रिंग रोल तयार करा

स्प्रिंग रोल शीट सपाट ठेवा. मध्ये तयार केलेले स्टफिंग ठेवा. बाजू आत दुमडून घट्ट रोल करा आणि कडा कॉर्नफ्लोअरच्या पेस्टने चिकटवा.

Spring Roll Recipe

तळा किंवा बेक करा

गरम तेलात स्प्रिंग रोल सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा. हेल्दी पर्यायासाठी १८०°C तापमानावर १५-२० मिनिटे बेक किंवा एअर फ्रायही करू शकता.

spring roll | yandex

गरमागरम सर्व्ह करा

तयार स्प्रिंग रोल टोमॅटो केचप, ग्रीन चटणी, चिली गार्लिक सॉस किंवा शेजवान सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

spring roll | yandex

अधिक चवदार बनवण्यासाठी टिप

स्टफिंगमध्ये पनीर, मशरूम, स्वीट कॉर्न किंवा उकडलेले नूडल्स घातल्यास स्प्रिंग रोलची चव आणखी वाढते.

spring roll | yandex

स्टोरेज टिप

तयार रोल तळण्यापूर्वी एअरटाइट डब्यात ठेवून फ्रीजरमध्ये साठवू शकता. गरजेनुसार थेट तळून किंवा एअर फ्राय करून वापरता येतात.

spring roll | yandex

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Moong Dal Chilla Recipe | pinterest
येथे क्लिक करा