Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

१ कप पिवळी मूग डाळ (४-५ तास भिजवलेली), १ हिरवी मिरची, १ इंच आले, २-३ लसूण पाकळ्या (ऐच्छिक), चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, हळद, जिरे आणि तवा भाजण्यासाठी थोडे तेल किंवा तूप.

Moong Dal Chilla

डाळीचे पीठ तयार करा

भिजवलेली मूग डाळ, हिरवी मिरची, आले आणि लसूण मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. मिश्रण ना खूप पातळ ना खूप घट्ट असे ठेवा.

Moong Dal Chilla | yandex

भाज्या आणि मसाले मिसळा

तयार मिश्रणात चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, जिरे आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य नीट एकजीव करा.

Moong Dal Chilla | Pinterest

चिल्ला तव्यावर पसरवा

गरम तव्यावर थोडे तेल लावून एक डाव मिश्रण घाला आणि हलक्या हाताने गोल आकारात पसरवा. मध्यम आचेवर शिजू द्या.

Moong Dal Chilla | Freepik

दोन्ही बाजूंनी भाजून घ्या

एका बाजूने सोनेरी रंग आल्यावर थोडे तेल किंवा तूप सोडा आणि चिल्ला पलटून दुसरी बाजूही छान कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

Moong Dal Chilla

गरमागरम सर्व्ह करा

तयार मूग डाळ चिल्ला हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, दही किंवा पुदिना चटणीसोबत सर्व्ह करा. हा नाश्ता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो.

Moong Dal Chilla Recipe | freepik

हेल्दी बनवण्यासाठी टिप

चिल्लामध्ये किसलेले गाजर, पालक, बीट, शिमला मिरची किंवा पनीर घातल्यास त्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढतात. वजन कमी करणाऱ्यांसाठीही हा उत्तम नाश्ता आहे.

Moong Dal Chilla

Water Intake: तुमच्या वजनानुसार किती पाणी प्यावे? जाणून घ्या पाण्याचे योग्य प्रमाण किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Intake | Saam Tv
येथे क्लिक करा