

लाडकी बहीण योजनेची महत्वाची अपडेट समोर
ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींची धावाधाव सुरू
ई-केवायसीबाबत सरकारी अधिकाऱ्यांचं मोठं भाष्य
अक्षय शिंदे, साम टीव्ही
राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालीये. अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहे. दुसरीकडे या योजनेतून ७० लाख महिलांना योजना वगळण्यात आलं आहे. ई-केवायसी न केल्याने पैसे खात्यात जमा झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ई-केवायसी करण्यासाठी महिलांची धावपळ वाढली आहे. मात्र, ई-केवायसी सुरू नसल्याचे स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
महाराष्ट्रात विविध भागात अपात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकीचा हप्ता जमा झालेला नाही. जालन्यातही काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे जालन्यातील शेकडो महिला सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या.
दुसरीकडे महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाकडून ईकेवायसी सुरू नसल्याचा फलक लावण्यात आला होता. ई-केवायसी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे ई-केवायसी सुरू नसल्याचं महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं.
ज्या महिलांची ईकेवायसी केलेली नाही , जोपर्यंत शासनाकडून लिंक येत नाही, तोपर्यंत वाट पहावी, असं अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र महिला व बाल विकास विभागाला शासनाकडून कोणताही अशा प्रकारचा आदेश आला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा न झाल्याचं देखील काही महिलांनी सांगितलं.
ई-केवायसी पुन्हा सुरू होणार का?
काही पात्र महिलांनाही लाडकीचे पैसे आले नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे आम्हाला पात्र असतानाही पैसे का मिळाले नाहीत, असा महिलांकडून केला जात आहे. यावर आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. 'लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी होत राहील. त्यामुळे राज्यातील एकही पात्र लाडकी ओवाळणीपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.