Government Scheme  meta ai
बिझनेस

Government Scheme : विद्यार्थांना दरमहा ₹१,००० मिळणार; योजनेचा लाभ कुणाला मिळणार? जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Education Assistance : दिल्ली सरकारकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार दरमहिन्याला ५०० ते १००० रुपये मिळणार आहेत.

Sakshi Sunil Jadhav

सरकारकडून मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. दिल्ली भवन आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात (DBOCWW Board) नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेनुसार दरमहिन्याला ५०० ते १००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२६ आहे.

या योजनेचा लाभ दिल्लीतल्या प्रत्येक नागरिकाच्या मुलांना मिळणार नाही. दिल्ली भवन आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांसाठीच ही शैक्षणिक मदत उपलब्ध आहे. मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, Rule २८१ अंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मदतीची रक्कम वेगवेगळी आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महिन्याला ५०० रुपये म्हणजेच वर्षाला ६००० रुपये मिळतील. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना महिन्याला ७०० रुपये म्हणजे वर्षाला ८,४०० रुपये, तर अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना महिन्याला १००० रुपये म्हणजेच वर्षाला १२,००० रुपयांची मदत मिळणार आहे.

या योजनेसाठी बांधकाम कामगाराची मंडळाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असणे आणि मागच्या १२ महिन्यांमध्ये ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर सदस्यत्त्व अपडेट करणंही गरजेचं आहे.

शिक्षण सहाय्यासाठी विद्यार्थ्याची ५० टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. मान्यताप्राप्त खासगी शाळा, केंद्रीय विद्यालय, दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळा, NDMC आणि MCD शाळांमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

पात्र कामगारांनी आणि विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्हा कार्यालयात अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२६ असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : पुण्याजवळील विरंगुळ्याचे ठिकाण, पावसाळ्यात तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ

Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; जंतर-मंतर 'सीझन २' लवकरच, अमित शहांवरही गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

1000 वंदे भारत, 35000 कोटींचं बजेट, यावर्षी २७ नव्या वंदे भारत ट्रॅकवर धावणार, रेल्वेचा मेगाप्लान

Health Care: वजन कमी करण्यासाठी सकाळची सुरुवात करा 'या' पाण्याने; शरीराला मिळतील ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT