MSME Credit Card Saam Tv
बिझनेस

Government Scheme: सरकारने लाँच केली नवी योजना! व्यवसायासाठी मिळणार ५ लाखांचे ME कार्ड; कोणाला होणार फायदा?

MSME Credit Card: केंद्र सरकारने व्यवसाय सुरु करण्यासाठी एमएसएमई योजना सुरु केली आहे. या योजनेत तुम्हाला ५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळते. या योजनेत आता एमई क्रेडिट कार्डदेखील दिले जाणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने लाँच केली नवी योजना

एमएसएमई योजनेअंतर्गत मिळणार ५ लाखांचं कर्ज

एमई क्रेडिट कार्ड देणार

केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजनांमध्ये तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. सरकारने अशीच एक योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देते. लघु, मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात निर्मला सितारामन यांनी ही घोषणा केली होती.

ME कार्ड आहे तरी काय? (What Is ME Card)

आता ही योजना लाँच केली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी उद्यम या पोर्टलवर लहान उद्योगांसाठी एमई कार्ड ही योजना सुरु केली आहे. अर्थमंत्र्‍यांनी याबाबत सांगितले होते की, या कार्डची कमाल मर्यादा ५ लाख रुपये असेल. पहिल्या वर्षी १० लाख तरुणांना एमई कार्ड दिले जातील. लहान व्यवसायांना भांडवल देणे आणि बँकांकडून कर्ज मिळवण्याची प्रोसेस सुलभ करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. (ME Card)

डिजिटल पेमेंटला चालना

अर्थ मंत्रालयाने सांगितले की, एमई कार्डमुळे लहान आणि मध्यम उद्योगांना भांडवल मिळणार आहे. हे कार्ड डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देईल. हे कार्ड यूपीआय आणि राष्ट्रीय क्रेडिट गॅरंटी प्लॅटफॉर्मशी जोडले जाणार आहे. यामध्ये क्रेडिट गॅरंटी कव्हर कोटींवरुन १० कोटींपर्यंत वाढवली जाणार आहे. पुढील पाच वर्षात लघु आणि मध्यम उद्योगांना १.५ लाख कोटी अतिरिक्त कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे.

निर्यात क्रेंदित एमएसएमई युनिटला २० कोटींपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध असणार आहे. यामुळे निर्यातीत आणखी वाढ होईल. गुंतवणूक आणि टर्नओव्हरदेखील वाढेल. यामुळे स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Chaat Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा चटपटीत आलू चाट, बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन परिसरात प्रस्तावित असलेले MICE सेंटरची निविदा अखेर रद्द

Types of Bridal Makeup: यंदा कर्तव्य आहे? मग जाणून घ्या कोण-कोणत्या प्रकारचे असतात ब्राइडल मेकअप

रहमान डकैतच्या एनकाऊंटरनंतर ल्यारीमध्ये नेमकं काय घडलं?

Aloe Vera Benefits For Skin: हिवाळ्यात चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT