Mahila Sanman Saving Certificate Saam Tv
बिझनेस

Government Scheme For Women: एकदा गुंतवणूक करा अन् दोन वर्षात लखपती व्हा; केंद्र सरकारची महिलांसाठी खास योजना, वाचा सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकार नागरिकांसाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असतात. विशेषत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यातील एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. या योजनेत महिलांना गुंतवणूकीवर भरघोस परतावा मिळतो.

या योजने महिला गुंतवणूक करु शकतात.महिलांसोबतच पालकदेखील आपल्या मुलींसाठी या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. भविष्यात महिलांना आर्थिक अडचण येऊ नये, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. मुलींच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी हे पैसे उपयोगी ठरतात. सरकारने फक्त २ वर्षासाठी ही योजना राबवली आहे. २०२३-२५ या वर्षांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेवर महिलांना ७.५ टक्के व्याज मिळते. या योजनेत महिला फक्त दोन वर्षासाठी गुंतवणूक करु शकतात. महिला जास्तीत २ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकता.

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी, त्यांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत भरघोस व्याज दिले जाते. त्याचसोबत टीडीएस कपातीतूनदेखील सूट दिली जाते. या योजनेत ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न ४० ते ५० लाख रुपये आहे त्यांनाच टीडीएस लागू होईल. तुम्ही या योजनेत १० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी खाते उघडू शकतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत जर तुम्ही २ लाख रुपये गुंतवणूक केली तर दोन वर्षांनी तुम्हाला २.३२ लाख रुपये परत मिळतील. तु्म्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Grand Finale: ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना-वैभवच्या धमाकेदार डान्सचा जलवा

Sabudana Role Recipe: उपवासाठी तयार करा झटपट साबूदाणा रोल्स, वाचा परफेक्ट रेसिपी

Marathi News Live Updates : उड्डाण पुलाच्या कामाच्या श्रेयवादाची लढाई; भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

Nandurbar News : भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडले; शंभरहून अधिक मेंढ्या ठार

Sanjay Raut: 'कितीही फिरले, थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार..', संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

SCROLL FOR NEXT