Fixed Deposit Scheme : SBI च्या 400 दिवसांच्या FD वर मिळणार बंपर व्याज, बँकेने 'ही' योजना पुन्हा केली सुरु

SBI च्या 400 दिवसांच्या FD वर मिळणार बंपर व्याज, जाणून घ्या काय आहे योजना
Fixed Deposit Scheme in Sbi
Fixed Deposit Scheme in Sbi saam tv
Published On

Fixed Deposit Scheme in Sbi : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पुन्हा एकदा आपली विशेष मुदत ठेव योजना गुंतवणुकीसाठी सुरु केली आहे. एसबीआयने 'अमृत कलश' (Sbi Amrit Kalash Fd) मुदत ठेव पुन्हा लॉन्च केली आहे.

ही 400 दिवसांची विशेष FD योजना आहे. यापूर्वी बँकेने ही मुदत ठेव योजना एका निश्चित कालावधीसाठी सुरू केली होती आणि ती 15 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध होती. बँक यामध्ये गुंतवणुकीवर 7 टक्क्यांपेक्षा जास्त दराने व्याज देत आहे. (Latest Marathi News)

Fixed Deposit Scheme in Sbi
Tata Motors Electric Cars : मुंबई-पुणे-मुंबई एक चार्जमध्ये गाठणार! Tata Nexon EV नवीन डार्क एडिशन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि रेंज

किती मिळणार व्याज?

एसबीआयच्या वेबसाइटनुसार, बँक 400 दिवसांच्या विशेष मुदत ठेवींवर 7.10 टक्के दराने व्याज देईल. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के दराने व्याज मिळणार आहे. ही योजना 30 जूनपर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. (FD News)

जर सामान्य गुंतवणूकदारांनी या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना व्याज म्हणून वार्षिक 8,017 रुपये मिळतील. तसेच ज्येष्ठ नागरिकांना व्याज म्हणून 8,600 रुपये मिळतील. ही योजना 4000 दिवसांत मॅच्युअर होईल. म्हणजेच या योजनेत तुम्हाला 400 दिवसांची गुंतवणूक करावी लागेल.

Fixed Deposit Scheme in Sbi
Maharashtra Weather : जीवघेणा उन्हाळा, तब्येत सांभाळा! राज्याच्या तापमानात वाढ; या जिल्ह्यात घराबाहेर निघणंही कठीण

कर्ज सुविधा उपलब्ध

अमृत ​​कलश योजनेत (Sbi Amrit Kalash Fd) गुंतवणूक करणारे मासिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक आधारावर व्याज घेऊ शकतात. टीडीएस कापल्यानंतर या विशेष एफडी डिपॉझिटवरील मॅच्युरिटी व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाईल. आयकर कायद्यानुसार लागू होणाऱ्या दराने टीडीएस आकारला जाईल. अमृत ​​कलश योजनेत मुदतपूर्व आणि कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. ही योजना 12 एप्रिल 2023 पासून गुंतवणुकीसाठी पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com