Maharashtra Weather : जीवघेणा उन्हाळा, तब्येत सांभाळा! राज्याच्या तापमानात वाढ; या जिल्ह्यात घराबाहेर निघणंही कठीण

जीवघेणा उन्हाळा, तब्येत सांभाळा! राज्याच्या तापमानात वाढ
Health In Heat Of Summer
Health In Heat Of SummerSaam Tv
Published On

Summer Heat : राज्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस - गारपीट तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून उष्माघात, ही दोन्ही संकटे अनेकांचा बळी घेतायत. त्यामुळे आता या संकटांना इतका उन्हाळा तरी तोंड द्यावं लागणार आहे.

कारण सध्या अंगाची लाही-लाही होत असताना उन्हामुळे घराबाहेर पडणं कठीण झालंय. राज्यात काल उष्माघातानं बारा जणांचा मृत्यू झाला. तर येत्या काही दिवसात उन्हाचा पारा वाढत गेला तर मोठं संकट ओढवेल.

गेल्या दहा वर्षांपासून राज्यात उन्हाचा पारा हळूहळू वाढत चालला आहे. मे महिन्याच्या मध्यामध्ये जाणवणारा उन्हाचा चटका आता एप्रिलमध्येच जाणू लागलाय. एप्रिल महिन्या वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्याने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे.

Health In Heat Of Summer
India America News : चीन राहिला मागे! आता अमेरिका आहे भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार; 78.31 अब्ज डॉलर्स गेली निर्यात

भुसावळमध्ये ४३.३ अंश सेल्सिअस तापमान

हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार उत्तर महाराष्ट्रातील भुसावळमध्ये ४३.३ अंश सेल्सिअस तापमान होते. ४३.२ अंश सेल्सिअस तापमानासह चंद्रपूर हे राज्यातील दुसरे सर्वात उष्ण शहर ठरले. तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. (Latest Marathi News)

कुठे किती तापमान?

जळगाव - ४१ अंश

नंदुरबार - ४१ अंश

मालेगाव - ४०.९ अंश

नाशिक - ३७ अंश

शिर्डी - ३७ अंश

संभाजीनगर : ४० अंश

जालना : ३९ अंश

उस्मानाबाद : ३६अंश

परभणी :३९.६ अंश

नांदेड : ३९.०५ अंश

हिंगोली :३५ अंश

Health In Heat Of Summer
Maharashtra Bhushan Award Ceremony: राजकीय स्वार्थाशिवाय इतके लोक कुणी बोलावतं का?; राज ठाकरेंनी सरकारच्या हेतूवरच घेतली शंका

मागच्या उन्हाळ्यात म्हणजे 2022 मध्ये उष्माघातामुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू झाले. २०२२ मध्ये उष्माघाताच्या ७६७ रुग्णांची नोंद झाली. तर त्यापैकी ३१ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला.

त्याअगोदर २०१५ मध्ये उष्माघातामुळे झालेले मृत्यू - २

२०१६ मध्ये उष्माघातामुळे झालेले मृत्यू - १९

२०१७ मध्ये उष्माघातामुळे झालेले मृत्यू - १३

२०१८ मध्ये उष्माघातामुळे झालेले मृत्यू - ९

२०१९ मध्ये उष्माघातामुळे झालेले मृत्यू - ९

त्यामुळे उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूचा आकडा आता वाढत चालला आहे. त्यामुळे आता काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.

BYTE: डॉ. क्षमा खोब्रागडे, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख, एसबी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर

अचानक ऊन वाढल्यानं शरिरावर त्याचे प्रतिकूल परिणाम शरीरावर जाणवतील. उष्णतेमुळे पुरळ येणं, उष्णतेनं स्नायूंमध्ये पेटके येणं, चक्कर येणं. उष्णतेनं शरीरात डिहायड्रेशन होणं आणि उष्माघात होऊ शकतो.

अशी घ्या काळजी

- बदलत्या तापमानात जास्त वेळ कष्टाची कामं करणं टाळावं. उन्हाळ्यामध्ये भर उन्हात फार वेळ काम करणं टाळावे.

- काचेचा कारखाना किंवा इतर कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणं टाळा.

- जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणं, घट्ट कपड्यांचा वापर करण टाळा.

- कष्टाची कामं सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करा.

- उष्णता शोषून घेणारे कपडे (काळा किंवा मटक रंगाचे) वापरू नयेत, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.

- जनसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावं.

- सरबत प्यावं.

- अधुनमधून उन्हामध्ये काम करणे टाळावे आणि सावलीत विश्रांती घ्यावी.

- उष्माघाताची लक्षणं सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणं थांबवावं आणि उपचार सुरु करावा.

- उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरण यांचा वापर करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com