Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: सरकारची खास योजना! माजी सैनिकांच्या मुलीच्या लग्नासाठी मिळणार १ लाख रुपये

Ex Servicemen Daughter Marriage Grant Scheme: माजी सैनिकांसाठी सरकारने योजना सुरु केली आहे. माजी सैनिकांच्या मुलांच्या लग्नासाठी १ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारची माजी सैनिकांसाठी योजना

माजी सैनिकांच्या मुलांच्या लग्नासाठी मिळणार १ लाख रुपये

अनुदानाची रक्कम दुप्पट केली

सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. सरकारने आता माजी सैनिकांसाठी अजून एक योजना सुरु केली आहे. माजी सैनिकांच्या मुलींच्या विवाहासाठी अनुदान दिले जाणार आहे. मुलींच्या लग्नासाठी १ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. याआधी ५० हजार रुपये दिले जात होते. आता ही रक्कम १ लाख करण्यात आली आहे.

कोल्हापूरातील जिल्हा सैनिक कार्यालयाकडे आलेल्या ९५ माजी सैनिकांच्या मुलींचे अर्ज स्विकारण्यात आले आहेत. मुलींना या महिन्यापासून रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे.

सरकारची ही योजना हवालदार रँकपर्यंतच्या माजी सैनिक कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ पेक्षा जास्त असावे. तसेच ज्या मुलीच्या लग्नासाठी अनुदान घेतले जाणार आहे तिचे नाव संबंधित सैनिकाच्या डिस्चार्ज बुकमध्ये असायला हवा. लग्न झाल्यापासून ६ महिन्यात अर्ज करायचा आहे.

या योजनेसाठी तुम्हाला मुलींचे दहावी,बारावीचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच वधू आणि वराचा फोटो लावून त्यावर स्वाक्षरी करायची आहे. याचसोबत तुम्हाला आणखी माहिती जिल्हा सैनिक कार्यालयात मिळणार आहे.

शिक्षणासाठीही मदत

माजी सैनिकांच्या मुलांसाठी शैक्षणिक अनुदानदेखील दिले जाते. यामध्ये मुलांना दर महिन्याला १ हजार रुपये म्हणजेच वर्षाला १२ हजार रुपये दिले जाते. यामध्येही वाढ करण्यात आली आहे. मुलांना शिक्षणासाठी २४ हजार रुपये मिळणार आहे. यासाठी कोल्हापूरच्या जिल्हा सैनिक कार्यालयात १४९४ अर्ज जमा झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? जरांगेंचा थेट हल्लाबोल

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

SCROLL FOR NEXT