Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: या सरकारी योजनेत महिलांना मिळतात २१०० रुपये; अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Deen Dayal Lado Laxmi Yojana: हरियाणा सरकारने दीन दयाल लाडो लक्ष्मी योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना २१०० रुपये मिळतात. या योजनेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यानंतर अनेक राज्य सरकारनेदेखील योजना राबवल्या आहेत. आता हरियाणा सरकारनेही महिलांनासाठी खास दीन दयाल लाडो लक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना २१०० रुपये मिळणार आहेत. या योजनेत आता फॉर्म भरण्याची प्रक्रियादेखील सुरु झाली आहे.

दीन दयाल लाडो लक्ष्मी योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोबाईल अॅप लाँच केले आहे. या अॅपवरुन महिला अवघ्या काही मिनिटांत फॉर्म भरु शकतात. अनेक महिलांनी फॉर्म भरलेदेखील आहेत.

दीन दयाल योजनेत फॉर्म भरल्यानंतर आता पात्र महिलांना १ नोव्हेंबरपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त ३ महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत २३ ते ६० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. याबाबत सर्व माहिती तुम्हाला मोबाईल अॅपवर मिळणार आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी आधी अॅप लाँच करा. त्यानंतर अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तिथे नाव, जन्म तारीख याबाबत माहिती टाकायची आहे. हरियाणाचे नागरिक आहे, असं नमूद करायचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा घरचा पत्ता, जिल्हा, गाव, पिनकोड लिहायचा आहे.

यानंतर तुम्हाला घरातील इतर सदस्यांचीही माहिती द्यावी लागणार आहे. त्यांचे आधार कार्ड वैगेरे द्यायचे आहे.

यानंतर तुम्हाला कुटुंबाच्या उत्पन्नाबाबत माहिती द्यायची आहे, फक्त १ लाख उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

यानंतर तुम्हाला सर्व बँक खात्याची सर्व माहिती द्यायची आहे.याचसोबत केवायसी करायचे आहे. जर तुम्ही चुकीची माहिती लिहली तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

SCROLL FOR NEXT