Government May Increase The PF Wage Limit Under EPFO Account Saam Tv
बिझनेस

EPFO New Update: पीएफसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता; वेतन मर्यादा १५००० रुपयांवरुन २१००० रुपये होणार

PF Wage Limit Hike News: नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पीएफ अकाउंट असते. पीएफसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारी पातळीवर सामाजिक सुरक्षा कव्हरेज (Security Coverage)वाढवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PF Wage Limit May Increase:

नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पीएफ अकाउंट असते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला काही पैसे जमा केले जातात. याचसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारी पातळीवर सामाजिक सुरक्षा कव्हरेज (Security Coverage)वाढवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत वेतन मर्यादा ही १५,००० रुपयांवरुन २१,००० रुपये होण्याची शक्याता आहे. (Latest EPFO News)

केंद्र सरकार लवकरच ईपीएफ वेतन मर्यादा वाढवण्याच्या तयारीत आहे. याआधी २०१४ मध्ये केंद्र सरकारने पीएफ मर्यादा वाढवली होती. त्यानंतर आता तब्बल १० वर्षांनी ईपीएफबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये पीएफ वतन मर्यादा ६,५०० वरुन १५००० रुपये करण्यात आली होती.

पीएफ वेतन मर्यादेत वाढ झाल्याचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होण्यार आहे. अनेक राज्यांमध्ये किमान वेतन हे १८००० ते २५००० रुपये आहे. या निर्णयाचा परिणाम ईपीएफ योजना आणि कर्मचारी निवृत्ती योजनामध्ये गुंतवलेल्या रक्कमेवरही होणार आहे. याचसोबत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर हा परिणाम होणार आहे.

कर्मचारी पेन्शन योजना (EPS) खात्यातील योगदानाची गणना मूळ वेतन १५,००० रुपये प्रति महिना या आधापावर केली जाते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमधून १८०० रुपये कट केले जातात. यानुसार आता वेतन मर्यादा २१००० रुपये झाल्यावर त्याचा परिणाम ईपीएसवरदेखील होणार आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे १,७४९ रुपये कापले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Bihar Government Formation: नितीश कुमार मुख्यमंत्री, भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'ही' २ नावं निश्चित

Shocking News : मैत्रीच्या आडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; नौदल कर्मचाऱ्यानं केला १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

Pune News : पुण्यात हॉटेलचा स्लॅब कोसळला, २ जण दबले; रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO

Gas Burned : गॅस बर्नर स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक

SCROLL FOR NEXT