Election Commission Rule: निवडणुकीदरम्यान तुम्ही किती रोख रक्कम घेऊन प्रवास करु शकता? जाणून घ्या नियम

Model Code of Conduct Rule on Keeping Cash While Traveling: आचारसंहिता सुरु असताना तुम्ही किती रोख रक्कम, दागिने किंवा दारु घेऊन प्रवास करु शकता याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
Maharashtra Election 2024: निवडणुकीदरम्यान तुम्ही किती रोख रक्कम घेऊन प्रवास करु शकता? जाणून घ्या नियम
How Much Cash You Can Keep While Travelling During Model Code of Conduct Know Election Commission RuleSaam Tv
Published On

Election Commission Rule on Carrying Cash:

सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण सुरु आहे. यात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला तर निवडणुकांचा निकाल हा ४ जूनला जाहिर होणार आहे. निवडणुकांमुळे देशभरात आचारसंहिता लागू आहे. अशावेळी नेत्यांनाच नाही तर सर्वसामान्यांना देखील काही नियम लागू करण्यात येतात.

MCC लागू झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच निवडणूक अधिकारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी देशाच्या विविध भागांतून ड्रग्ज आणि दारुसह कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच आचारसंहिता सुरु असताना तुम्ही किती रोख रक्कम (Money), दागिने किंवा दारु घेऊन प्रवास (Travel) करु शकता याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

यामध्ये तुमच्याकडेही मर्यादेपेक्षा रोख रक्कम असेल तर ती जप्त केली जाऊ शकते. याचे नियम कसे असतील जाणून घेऊया.

निवडणुकीदरम्यान (Election), तुमच्याकडे ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रोख किंवा १० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची भेटवस्तू असल्यास तुम्हाला त्याची कागदपत्रे दाखवावी लागणार आहे. यामध्ये तुम्ही बिल किंवा बँक स्टेटेमेंट्स दाखवले नाही तर रक्कम जप्त केली जाऊ शकते.

Maharashtra Election 2024: निवडणुकीदरम्यान तुम्ही किती रोख रक्कम घेऊन प्रवास करु शकता? जाणून घ्या नियम
Voter List : मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही? कसे कळेल? असं करा चेक

जर तुम्ही व्यवसाय किंवा इतर काही करत असाल तर त्या रक्कमेची अधिकृत नोंद असणे गरजेचे आहे. ज्यामुळे अधिकाऱ्याची चौकशी केली तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.

1. जप्त केलेली रक्कम परत मिळेल का?

जप्त केलेली रक्कम परत मिळते. तपासादरम्यान तुम्ही अधिकाऱ्यांना योग्य ती कागदपत्रे दाखवून रक्कम परत मिळू शकते.

Maharashtra Election 2024: निवडणुकीदरम्यान तुम्ही किती रोख रक्कम घेऊन प्रवास करु शकता? जाणून घ्या नियम
Voter ID कार्डवर नावाची स्पेलिंग चुकली असेल तर...? घरबसल्या बदलू शकता, या सोप्या स्टेप्स फॉलो करा

निवडणुकीच्या काळात दारुचे वितरण रोखण्यासाठी दारुची वाहतुक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर १० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची औषधे, भेटवस्तू आणि दारु बाळगणे बेकायदेशीर मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com