Voter List : मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही? कसे कळेल? असं करा चेक

How To Check Voter List Name : जर तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार असाल. नुकताच मतदार ओळखपत्रासाठी अर्ज केला असेल किंवा नवीन ठिकाणाहून मतदार ओळखपत्र बनवले असेल, तर मतदान करण्यापूर्वी मतदार यादीत तुमचे नाव नक्की तपासा.
Voter List, How To Check Voter List Name
Voter List, How To Check Voter List NameSaam Tv

Lok Sabha Elections 2024:

लोकसभा निवडणूक २०२४ लवकरच सुरु होणार आहे. हे मतदान एकूण सात टप्प्यांमध्ये होणार आहे. १८ वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे.

परंतु, जर तुम्ही पहिल्यांदाच मतदान (Voter) करणार असाल. नुकताच मतदार ओळखपत्रासाठी अर्ज केला असेल किंवा नवीन ठिकाणाहून मतदार ओळखपत्र बनवले असेल, तर मतदान करण्यापूर्वी मतदार यादीत (List) तुमचे नाव नक्की तपासा.

तुमचे नाव मतदार यादीत आहे की, नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन (Online) किंवा एसएमएसद्वारेही मिळवू शकता. यादीतले नाव कसे चेक करायचे जाणून घेऊया

Voter List, How To Check Voter List Name
Voter ID कार्डवर नावाची स्पेलिंग चुकली असेल तर...? घरबसल्या बदलू शकता, या सोप्या स्टेप्स फॉलो करा

1. या पद्धतीने करा मतदार यादीतले तुमचे नाव

  • सर्वात आधी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • वेबसाइटर ओपन झाल्यावर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला तुमची भाषा निवडा.

  • त्यानंतर मतदार यादीत शोधा वर क्लिक करा.

  • या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील. EPIC , तपशील, मोबाइलच्या माध्यमातून शोधू शकतो.

  • यापैकी एकावर क्लिक करुन तुमचा तपशील भरा, कॅप्चा टाका यावरुन तुम्हाला मतदार यादीत तुमचे नाव आहे की, नाही कळेल.

Voter List, How To Check Voter List Name
Today's Gold Silver Rate : सोनं ७२ हजारांच्या पल्ल्याड, चांदीनंही भाव खाल्ला, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

2. एसएमसद्वारे तपासा

एसएमएसच्या मदतीने तुम्हाला मतदार यादीत तुमचे नाव आहे की, नाही हे पाहता येईल. यासाठी तुम्हाला नोंदणी क्रमांकाची आवश्यकता असेल. जो तुम्हाला मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करताना मिळतो. तुम्ही EPIC <space> Voter ID क्रमांक टाइप करून 1950 वर एसएमएस पाठवल्यास तुमचे नाव कुठे आहे हे कळते.

3. हेल्पलाइन क्रमांक

मतदार यादीत तुमचे नाव आहे की, नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या टोल फ्री क्रमांकावर डायल करुन माहिती मिळू शकते. यासाठी १९५० हा नंबर डायल करा. त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांचा उत्तर द्या. त्यावरुन तुम्हाला तुमचे मतदान यादीतील नाव कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com