Today's Gold Silver Rate : सोनं ७२ हजारांच्या पल्ल्याड, चांदीनंही भाव खाल्ला, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

(10th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला मंगळवारी सोने ९०० रुपयांनी वधारुन ७२,२०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते.
Today's Gold Silver Rate, (10th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Today's Gold Silver Rate, (10th April 2024) Gold Silver Price In MaharashtraSaam Tv

24k Gold Silver Rate In Maharashtra:

गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला मंगळवारी सोने ९०० रुपयांनी वधारुन ७२,२०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते.

सोन्याच्या भावात वाढ होत असतानाही बाजारात ग्राहकांचा उत्साह दिसला. तर चांदीच्या भावात १०० रुपयांची घसरण होऊन ८२,९०० रुपये प्रति किलोवर राहिली. १ एप्रिलला ६९, ४०० रुपये असलेल्या सोन्याच्या भावात ९ दिवसात दोन हजार ८०० रुपयांची वाढ झाली.

लग्नसराईच्या काळात दागिन्यांना अधिक मागणी असते. अशातच एमसीएक्सवर आणि कॉमेक्सवर सोन्याने उच्चांक पातळी गाठली आहे. आज महाराष्ट्रात सोन्याचा -चांदीचा भाव किती जाणून घेऊया.

Today's Gold Silver Rate, (10th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Electric Vehicles : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी! कारमध्ये ३१ टक्के तर बाईकमध्ये ८ टक्क्यांनी वाढ

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६२५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,२६० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ३८० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८५,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

Today's Gold Silver Rate, (10th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Sleeping Problem : ५ तासांपेक्षा कमी झोप घेताय? आरोग्यासाठी ठरु शकते घातक

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ७२,११० रुपये

  • पुणे - ७२,११० रुपये

  • नागपूर - ७२,११० रुपये

  • नाशिक - ७२,१४० रुपये

  • ठाणे - ७२,११० रुपये

  • अमरावती - ७२,११० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com