कोमल दामुद्रे
आरोग्य तज्ज्ञांच्या मते २४ तासांपैकी व्यक्तीने ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. यामुळे आपले आरोग्य चांगले राहाते.
आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पुरेशी झोप घेता येत नाही. त्यामुळे आपण लवकर आजारी पडतो.
जे लोक ५ तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर
५ तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने आपल्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.
झोपेच्या वेळी, आपला मेंदू अशाप्रकारे कार्य करतो की, गोष्टी लक्षात ठेवणे सोपे होते. याउलट जर आपण कमी झोप घेतली की, नैराश्य, चिंता, तणाव या समस्यांना सामोरे जावे लागते.
५ तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेहासारखा गंभीर आजाराला बळी पडू शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा