कोमल दामुद्रे
टोमॅटो खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. टोमॅटोमध्ये जीवनसत्त्व क आणि अँटिऑक्सिडंट आढळतात.
टोमॅटो खाल्ल्याने शरीराला कसे फायदे होतात जाणून घ्या
रोज एक टोमॅटो खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते.
टोमॅटोमध्ये लाइकोपीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित टोमॅटो खाल्ल्याने इंसुलिन पेशींचे कार्य सुधारण्यास मदत होते.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा -कॅरोटीन असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
कमी फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. यासाठी आहारात टोमॅटोचा समावेश करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा