कोमल दामुद्रे
अंड्यातून शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. ज्यामुळे आपले शरीर अधिक ऊर्जावान बनते.
अंडी अधिक गरम असल्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने नुकसान होऊ शकते.
अंड्याच्या पांढऱ्या भागात सेलेनियम, व्हिटॅमिन डी, बी६, बी१२ आणि झिंक आणि लोहासारखे खनिजे असतात. अंड्यातील पिवळा बलकमध्ये चरबी आढळते.
उन्हाळ्यात तुम्ही दिवसातून १ ते २ अंडी खाऊ शकता. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर फक्त अंड्याचा पांढरा भाग खा.
अंडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केस आणि त्वचेसाठीही हे खूप फायदेशीर मानले जाते.
अंडी उष्ण असतात त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने पोटातील उष्णता वाढते. यामुळे अॅसिडिटी आणि पिंपल्ससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा