DA Hike Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आठव्या वेतन आयोगाआधीच पगार वाढणार; वाचा सविस्तर

Central Government Employees DA Hike and DR Increase: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढवला जाऊ शकतो.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज

महागाई भत्ता आणि डीआर वाढणार

जानेवारीपासूचा डीए लवकरच मिळणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष खूप चांगले असणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, त्याआधीच आता महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईची नवीन आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे यावेळी पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. याचसोबत आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत हालचालींना वेग मिळाला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे AICPI-IW मध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ०.५ अंकांची वाढ झाली. यामुळे एकूण रेट १४८.२ वर पोहचला आहे. गेल्या पाच महिन्यापासून महागाई निर्देशांक वाढत आहे. त्यामुळे यावेळी महागाई भत्ता चांगला वाढण्याची शक्यता आहे.

याचाच अर्थ असा की, जानेवारी २०२६ मध्ये महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरुन ६० टक्के होऊ शकतो. जर डिसेंबरचाही डेटा वाढलेला आला तर पगारात चांगली वाढ होईल. याबाबतचा निर्णय सरकार घेईल. वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ केली जाते.

सरकार दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याचा आढावा घेते. याआधारे डीए आणि पेन्शनधारकांसाठी डीआर निश्चित करते. सध्याचा डेटा हा जुलै ते नोव्हेंबरचा आहे. यामुळे जानेवारीपासून जो महागाई भत्ता लागू केला जाईल तो डिसेंबरच्या डेटावर अवलंबून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गावर ९ ते १३ जानेवारी दरम्यान वाहतूक विस्कळीत

Maharashtra Politics: भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी, राष्ट्रवादीच्या नेत्याची सडकून टीका

Gold Rate: आनंदाची बातमी! सराफा बाजारात सोन्याचे दर ९०० रुपयांनी घसरले, चांदीचीही चकाकी उतरली

Thane Accident : ठाण्यात सकाळी विचित्र अपघात, ५ ते ६ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक; अनेक कारचा चुराडा; पाहा VIDEO

Kolhapur Tourism : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या पन्हाळा किल्ल्याजवळील गड, 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT