सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरु आहे. विधानसभेत महायुती सरकारला मोठं यश मिळालं आहे. महायुती सरकारला यश मिळाल्यानंतर आता शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना यंदा भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींनी भावाला भाऊबीजेची ओवाळणी दिली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच भाऊबीजेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रांमध्ये विशेष उल्लेख करत ही अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे. (Government Give Holidays On Bhaubeej)
डिसेंबर महिना सुरु आहे. नवीन वर्ष सुरु व्हायला काहीच दिवस उरले आहेत. नवीन वर्षात २३ ऑक्टोबरला भाऊबीज आहे. त्यामुळे २३ ऑक्टोबर २०२५ गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. दरवर्षी एकूण २४ सुट्टया दिल्या जातात. या सुट्ट्यांमध्ये आता एका सुट्टीची वाढ झाली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक २५ सुट्ट्या मिळणार आहे. लाडक्या बहिणींनी दिलेल्या यशामुळे सुट्टी दिल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
शासकीय सुट्ट्यांची यादी (Public Holidays In 2025)
प्रजासत्ताक दिन- २६ जानेवारी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती- १९ फेब्रुवारी २०२५
महाशिवरात्री-२६ फेब्रुवारी
होळी-१४ मार्च
गुढीपाडवा-३० मार्च २०२५
रमझान ईद-३१ मार्च २०२५
रामनवमी- ६ एप्रिल २०२४
महावीर जन्म कल्याणक-१० एप्रिल २०१५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंची- १४ एप्रिल २०२५
गुड फ्रायडे-१८ एप्रिल २०२५
महाराष्ट्र दिन- १ मे २०२५
बुद्ध पोर्णिमा-१२ मे २०२५
बकरी ईद- ७ जून २०२५
मोहरम- ६ जुलै २०२५
स्वातंत्र्य दिन-१५ ऑगस्ट २०२५
पारशी नववर्षी- १५ ऑगस्ट २०२५
गणेश चतुर्थी-२७ ऑगस्ट २०२५
ईद-ए-मिलाद- ५ सप्टेंबर २०२५
महात्मा गांधी जयंती- २ऑक्टेबर २०२५
दसरा-२ ऑक्टोबर
दिवाळी अमावस्या-२१ ऑक्टोबर
दिवाळी-२२ ऑक्टोबर २०२४
गुरुनानक जयंती-५ नोव्हेंबर २०२५
ख्रिसमस- २५ डिसेंबर २०२५
या सुट्ट्यांमध्ये आता भाऊबीजेची सुट्टीदेखील देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण २५ सुट्ट्या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.