
महायुतीच्या 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना'ला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जातात. महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेचा खूप फायदा झाला. लाडक्या बहिणींनी या निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून मतदान केले.
विधानसभा निवडणुकांमुळे डिसेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते. आता हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न त्यांना पडला आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हफ्ता एकत्र मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना आतापर्यंत ५ हफ्त्याचे पैसे मिळाले आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये जमा झाले. डिसेंबर महिन्याचा म्हणजे सहाव्या हफ्त्याचे पैसे त्यांना मिळाले नाही. आता या सहाव्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न या लाडक्या बहिणींना पडला आहे. महत्वाचे म्हणजे महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्नासन देखील देण्यात आले होते. त्यामुळे या योजनेअंतर्गत हा हफ्ता कधी मिळणार याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत.
लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना एकाच वेळी ३००० रुपये मिळणार आहेत. हे पैसे मकरसंक्रांतीपूर्वी मिळेल अशी माहिती समोर येत आहे. पण याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
आज राज्यामध्ये महायुतीचे नवं सरकार स्थापन होत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधी संपल्यानंतर आणि मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यााबाबत निर्णय होण्याची माहिती देखील समोर आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी देखील याबाबत माध्यमांना माहिती दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.