Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Radha Krishna Vikhe Patil on Maharashtra Election Result : नगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांची सरशी पाहायला मिळत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक उमेदवार आघाडीवर आहेत.
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar
Maharashtra Election ResultSaam tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

शिर्डी : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलात महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना फटका बसताना दिसत आहे. महायुतीने थेट विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. शिर्डीतही भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील हे देखील विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. यावर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याच्या निवडणुकीचे मतमोजणीत महायुतीचे २१७ उमेदवार आघाडीवर आहेत. महायुतीच्या अनेक उमेदवारांनी विजयाकडे वाटचाल केली आहे. शिर्डीतही भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत. विखे पाटील बाराव्या फेरी अखेर ३४,७९९ मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या प्रभावती घोगरे पिछाडीवर आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीवर जाताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी हस्तांदोलन करत गळाभेट घेतली.

Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar
Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

यावर मतमोजणीवर विखे पाटील म्हणाले, माझा विजय मतदारसंघातील जनतेला समर्पित आहेत. सुजयने माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. खरंतर महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. संजय राऊत यांना महाविकास आघाडीने बाहेर काढलं पाहिजे'.

Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar
Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar
Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

दरम्यान, नगरमध्येही महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नगर शहर मतदारसंघात महायुतीचे संग्राम जगताप आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर पिछाडीवर आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातही बाराव्या फेरीनंतर महायुतीचे अमोल खताळ आघाडीवर आहेत. तर बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार काशिनात दाते आघाडीवर आहेत. आठव्या फेरीत दाते यांना ४७२५ मतांनी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीच्या राणी लंके पिछाडीवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com