Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Maharashtra Vidhansabha Election Result 2024: राज्यात निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निकालाच्या सुरुवातीच्या कलामध्ये दिग्गज नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर
Maharashtra Election ResultSaam tv
Published On

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरु झाली आहे. राज्यातील काही ठिकाणी ७ ते ८ व्या फेऱ्यांची मोजणी सुरु आहे. या मतमोजणीनुसार, राज्यातील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. तर महायुतीने मोठी मजल मारली आहे. या लढाईत महायुतीसह महाविकास आघाडीचे दिग्गेज उमेदवार पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नावाचा समावेश आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीत दिग्गज नेत्यांना झटका बसताना दिसत आहे. बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार सारखे दिग्गज नेते पिछाडीवर दिसत आहे.

राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर
Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

या निकालाने या दिग्गज नेत्यांची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे या मतमोजणीचे सुरुवातीचे कल महायुतीच्या बाजूने झुकलेले दिसत आहे. तरीही महायुतीमधील काही दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.

राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर
Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

नगरमधील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. तर काही फेऱ्यांमध्ये छगन भुजबळ देखील पिछाडीवर होते. मात्र, नंतरच्या फेरीत छगन भुजबळ यांनी आघाडी घेतली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. थोरात तब्बल ४४९२ मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांच्या मतदारसंघात महायुतीचे अमोल खताळ आघाडीवर आहेत.

राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर
Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

धाराशिवमधील परंडा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीखअखेर महायुतीचे तानाजी सावंत ५२९ मतांनी पिछाडीवर असल्याचे समोर आलं आहे. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार पिछाडीवर गेले आहेत. पाचव्या फेरी अखेर अब्दुल सत्तार २०६ मतांनी पिछाडीवर आहे. तर ठाकरे गटाचे सुरेश बनकर हे आघाडीवर आहेत.

अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर ४४३८ मतांनी पिछाडीवर आहेत. तर अचलपूर मतदारसंघात प्रहारचे बच्चू कडू जवळपास १६ मतांनी पिछाडीवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com