Railway Timetable : रेल्वेचं मोठं गिफ्ट, मुंबईतून रोज ५६ अतिरिक्त ट्रेन धावणार, वेळापत्रक आणि मार्ग जाणून घ्या!

Railway Timetable For December: रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस आणि हिवाळ्याच्या सुट्टीत रेल्वे अतिरिक्त गाड्या सोडणार आहे.
Railway
Railway Saam Tv
Published On

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात. त्यामुळे अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करत असतात. सुट्ट्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्यात रेल्वे काही अतिरिक्त गाड्या सोडणार आहे. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे मुंबई - करमाळी/कोचुवेली आणि पुणे - करमाळी दरम्यान ४८ विशेष गाड्या चालवणार

मध्य रेल्वे ख्रिसमस आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई - करमाळी/कोचुवेली आणि पुणे - करमाळी दरम्यान ४८ विशेष गाड्या चालवणार आहे.

तपशील खालीलप्रमाणे:-

1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - करमाळी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैंनदिन विशेष - ३४ सेवा

01151 विशेष दि. २०.१२.२०२४ ते दि. ०५.०१.२०२५ पर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ००.२० वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (१७ सेवा)

01152 विशेष दि. २०.१२.२०२४ ते दि. ०५.०१.२०२५ पर्यंत करमाळी येथून दररोज १४.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (१७ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवि.

संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, तीन द्वितीय वातानुकूलित, ११ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, २ सामन्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेजसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

Railway
Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

2. लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचुवेली - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष - ८ सेवा

01463 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १९.१२.२०२४ ते दि. ०९.०१.२०२५ पर्यंत दर गुरुवारी १६.०० वाजता सुटेल आणि कोचुवेली येथे दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल. (४ सेवा)

01464 विशेष दि. २१.१२.२०२४ ते दि. ११.०१.२०२५ पर्यंत दर शनिवारी कोचुवेली येथून १६.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.४५ वाजता पोहोचेल. (४ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मूकनबिका रोड, बाय कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, ठोकूर, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर, थ्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिकारा, कायनकुलम आणि कोल्लम

संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.

Railway
Ladki Bahin Yojana : तब्बल 10 हजार लाडक्या अपात्र, अपात्रतेच्या यादीत तुमचंही नाव? पाहा स्पेशल रिपोर्ट

3. पुणे -करमाळी - पुणे साप्ताहिक विशेष (६ सेवा)

01407 विशेष गाडी दि. २५.१२.२०४ ते दि. ०८.०१.२०२५ पर्यंत दर बुधवारी ०५.१० वाजता पुणे येथून सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी २०.२५ वाजता पोहोचेल. (३ सेवा)

01408 विशेष गाडी दि. २५.१२.२०२४ ते दि. ०८.०१.२०२५ पर्यंत दर बुधवारी करमाळी येथून २२.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल. (३ सेवा)

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.

संरचना: एक वातानुकूलीत प्रथम श्रेणी, एक द्वितीय वातानुकूलीत, २ तृतीय वातानुकूलीत, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेजसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

आरक्षण: विशेष ट्रेन क्र.01151/01152, 01463 आणि 01407/01408 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १४.१२.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.

या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

Railway
Government Scheme: तरुणांना मिळणार ५० लाखांची मदत, महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com