Google Map Feature Saam Tv
बिझनेस

Google Map Feature: गुगल मॅपचे ६ जबरदस्त फीचर! EV चार्जिंग स्टेशन ते मेट्रो तिकीट बुकिंग करणे होणार सोपे;यूजर्ससाठी महत्त्वाचा निर्णय

Google Map Feature For India: गुगल मॅपमध्ये ६ नवीन फीचर्स लाँच करण्यात आले आहे. या फीचरमुळे युजर्संना एखादा पत्ता शोधणे, मेट्रो तिकीट बुकींग या सर्व सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवासात वाहनचालकांना गुगल मॅपचा खूप फायदा होणार आहे.

Siddhi Hande

गुगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. गुगलचा वापर करुन तुम्ही जगातील कोणतीही माहिती चुटकीसरशी मिळवू शकतात. गुगलने युजर्ससाठी नुकतेच नवीन फीचर लाँच केले आहेत. भारतात या फिचरमुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मदत होणार आहे.

भारतात एखादा पत्ता शोधण्यासाठी खूप समस्या होतात. त्यांना रस्ता, ठिकाण शोधण्यासाठी अडथळे येऊ नये त्यासाठी एआयचा वापर करुन नवीन फीचर लाँच केले आहेत. या नवीन फीचरमुळे फ्लाय ओवर, रस्ते, इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जर पॉइंट याबाबत सर्व माहिती मिळणार आहे.

AI Powered narrow road avoidance

अनेकदा गुगल मॅपवर अरुंद रस्त्यांची माहिती दिलेली नसते. त्यामुळे युजर्संना रस्ता शोधण्यासाठी अडचण येते. तसेच अरुंद रस्त्यात चारचाकी वाहन जात नसल्याने खूप समस्या येतात. त्यामुळे लोक गुगल मॅप्सला दोष देतात. याच गोष्टी थांबवण्यासाठी चारचाकी वाहनांसाठी योग्य रस्ता दाखवण्यासाठी या फीचरचा वापर करता येणार आहे. यामुळे अरुंद रस्त्यांची माहिती मिळणार आहे. जेणेकरुन चारचाकी वाहनचालक योग्य रस्त्यावरुन वाहन चालू शकतील.

Flyover Navigation

अनेकदा वाहनचालकांना फ्लायओव्हरवरुन जावे की नाही असा प्रश्न पडतो. गुगल मॅपवरुन फ्लायओव्हरवरुन आणि पर्यायी रस्त्याचा मार्ग दाखवला जातो. त्यामुळे नक्की कोणत्या मार्गाने जावे असा प्रश्न निर्माण होतो. याचसाठी गुगल मॅपवर आता फ्लायओव्हरसोबत इतर रस्त्यांची माहिती देणार आहेत.

मेट्रो तिकीट बुकिंग

चेन्नई आणि कोचीतील मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी गुगलने नवीन फीचर लाँच केले आहे. नमा यात्री आणि ओएनडीसीच्या मदतीने हे फीचर तयाप करण्यात आले आहे. त्यामुळे आता लोकांना गुगल मॅप्सवरुन मेट्रो तिकीट बुक करता येणार आहे.

EV चार्जिंग स्टेशन इंटिग्रेशन

गुगलने देशातील इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग उत्पादकांसोबत पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे गुगल मॅपवर देशातील ८ हजारांपेक्षा जास्त चार्जिंग स्टेशनची माहिती देण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या जवळचे चार्जिंग स्टेशन, चार्जर याबाबत सर्व माहिती मिळणार आहे.

Curated Local Recommendations

गुगलने दहा प्रमुख शहरे आणि त्यातील पर्यटन स्थळांबद्दलची माहिती गुगल मॅप्समध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे युजर्संना जवळील ठिकाणांबद्दल माहिती मिळेल.

Easier To Report incidents

गुगलच्या मॅपच्या मदतीने रस्त्यावर घडलेल्या कोणत्याही घटनेची माहितीची तक्रार करणे सोपे होते. तेथील स्थानिक व्यक्तींच्या मदतीने घडलेल्या घटनेची माहिती तेथील लोकांना मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT