Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! २१०० रुपये मिळणार पण...

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेत आता महिलांना २१०० रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या योजनेच्या २१०० रुपयांबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी काल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. काल विधानसभेत अजित पवारांना लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. दरम्यान, आता २१०० रुपयांबाबत अजित पवारांनी २१०० रुपयांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

२१०० रुपये कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) २१०० रुपये देणार,आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. सगळी सोंगे आणता येतात, पण पैशांचं सोंग आणता येत नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. यामुळे आता २१०० रुपये कधी देणार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

अर्थसंकल्पातील वित्त, अन्न व नागरी विभागाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. तर लाडकी बहीण योजनेतील महिलांना २१०० रुपये कधी देणार, अशी विचारणा सदस्यांनी काल विधानसभेत केली होती. त्यावर अजित पवारांनी ही माहिती दिली आहे.

एप्रिलचा हप्ता कधी येणार?

लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्यापर्यंत सर्व हप्ते देण्यात आले आहेत.दरम्यान, आता एप्रिलचा हप्ता मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. पुढच्या महिन्यात रामनवमीच्या मूहूर्तावर एप्रिल महिन्याचे पैसे कदाचित येऊ शकतात. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी देणार याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, लाडकी बहीण योजनेत ५ वर्षात कधीही २१०० रुपये देण्याची घोषणा होऊ शकते. जाहीरनामा हा ५ वर्षांसाठी असतो. या कालावधीत लाडकी बहीण योजनेबाबत घोषणा होऊ शकते, अशी माहिती आदिती तटकरेंनी मध्यंतरी दिली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कांदा, साखर प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा- सुनेत्रा पवार

हार्बर मार्गावरून लवकरच धावणार जलद लोकल; कसा असेल संपूर्ण प्रकल्प? महत्त्वाची माहिती समोर

प्रसिद्ध दिग्दर्शकानं घराच्या छतावरून उडी मारून जीवन संपवलं; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

High Blood Pressure: औषधांशिवाय BP कंट्रोल करायचाय? आजच सोडा या 3 धोकादायक सवयी

Cancer : पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर, 'या' लक्षणांकडून दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

SCROLL FOR NEXT