Sky Force OTT Release: अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' या ओटीटीवर होणार प्रदर्शित; जाणून घ्या रिलीजची तारीख

Sky Force OTT Release: अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांचा 'स्काय फोर्स' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Sky Force
Sky Force SAAM TV
Published On

Sky Force OTT Release: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटावर बॉक्स ऑफिसवर खूप कौतुकाचा वर्षाव झाला. या वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला IMDb वर १० पैकी ७ रेटिंग मिळाले आणि १६० कोटी रुपयांच्या या चित्रपटाने १६८ कोटी रुपये कमावले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही परंतु अक्षय कुमार आणि वीर परहरिया यांच्या कामाचे कौतुक झाले. थिएटरमधील कामगिरीनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

स्काय फोर्स चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होईल?

जर तुम्ही बॉक्स ऑफिसवर स्काय फोर्स चित्रपटाचा आनंद घेतला नसेल, तर आता तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल किंवा स्मार्ट टीव्हीवर त्याचा आनंद घेऊ शकता. हा चित्रपट OTT द्वारे २४० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केळवानी दिग्दर्शित हा चित्रपट २१ मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा भारत आणि पाकिस्तानमधील हवाई हल्ल्यावर आधारित आहे.

Sky Force
Yuzvendra Chahal Dhanashree Verma: ६० कोटी नाही; धनश्री वर्माला युजवेंद्र चहलकडून मिळणार 'इतक्या' कोटींची पोटगी

हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल?

या चित्रपटाबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला, "स्काय फोर्स चित्रपटाचे माझ्या हृदयात खूप खास स्थान आहे. सत्य घटनांवर आधारित असण्याव्यतिरिक्त, हा चित्रपट केवळ अ‍ॅक्शनपेक्षाही सैनिकांच्या भावनेवर आणि देशप्रेमावर आधारित आहे.

Sky Force
Tejasswi-Karan: टेलिव्हिजनची प्रसिद्ध जोडी तेजस्वी-करण लवकरच अडकणार लग्नबंधनात; आईनेच दिली खुश खबर!

मी खूप उत्सुक आहे

चित्रपटात कुमार ओम आहुजाची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे अक्षय कुमारने आपले भाग्य मानले. अक्षय म्हणाला की, हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे याबद्दल मी खूप उत्सुक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com