Diabetes: आजारपणात रक्तातील साखर वाढतेय? हे डायबिटीज होण्याचे संकेत असतात का?

Bharat Jadhav

शरीरात बदल होतात

संसर्गजन्य आजार झाला असेल तर विषाणूंशी लढा देण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा सक्रिय होते. यादरम्यान शरीरातील काही हार्मोन्स, चयापचय क्रिया, भूक आणि शारीरिक हालचाली यामध्ये बदल होऊ शकतात.

Why does blood sugar increase during fever or infection

साखर वाढते

या बदलांमुळे शरीरात ग्लुकोजची निर्मिती आणि त्याचा होणारा वापर यावर थेट परिणाम होतो. ज्यामुळे मधुमेह नसणाऱ्या व्यक्तींमध्येही संसर्गादरम्यान रक्तातील साखर नेहमीपेक्षा जास्त दिसून येऊ शकते.

Why does blood sugar increase during fever or infection | KAROLINA GRABOWSKA KABOOMPICS

शरीरातील साखर का वाढते?

आजाराचा सामना करण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जेची गरज भासते. या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी शरीरात कॉर्टिसॉल (Cortisol), ॲड्रिनॅलीन (Adrenaline) आणि ग्लुकागॉन (Glucagon) यांसारख्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वेगाने वाढू लागते. हे हार्मोन्स यकृताला रक्तामध्ये अधिक प्रमाणात ग्लुकोज म्हणजेच साखर सोडण्यासाठी उत्तेजित करतात.

Why does blood sugar increase during fever or infection

साखरेची पातळी नेहमीपेक्षा जास्त

स्ट्रेस हार्मोन्स शरीरातील पेशी आणि स्नायूंना इन्सुलिनचा योग्य वापर करण्यापासून रोखतात. स्वादुपिंड नेहमीप्रमाणे पुरेसे इन्सुलिन तयार करत असले, तरी शरीरातील पेशी या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसते. यामुळे स्नायू आणि इतर पेशी रक्तातील साखर शोषून घेऊ शकत नाही. आणि ही साखर रक्तातच साचून राहते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे रक्तातील साखरेची निर्मिती वेगाने होते.

Why does blood sugar increase during fever or infection

संसर्गादरम्यान रक्तातील साखर किती वाढू शकते?

आजाराचे स्वरूप किती गंभीर आहे. उपचारासाठी कोणती औषधे सुरू आहेत आणि संबंधित व्यक्तीचे चयापचय क्रिया कशी आहे, यावर ही पातळी अवलंबून असते. अगदी किरकोळ आजार असल्यास साखरेची पातळी काहीशी वाढते.

Why does blood sugar increase during fever or infection

मोठी समस्या असल्याचं कधी समजेल

आजारातून बरे झाल्यानंतर ‘उपाशीपोटी केली जाणारी साखरेची तपासणी’ (Fasting Glucose) आणि ‘HbA1c’ या चाचण्या मदत करतात. यामध्ये HbA1c ही चाचणी सर्वांत महत्त्वाची मानली जाते. गेल्या २ ते ३ महिन्यांतील साखरेची सरासरी पातळी दाखवत असते आणि तात्पुरत्या आजारपणाचा या चाचणीच्या निकालावर सहसा मोठा परिणाम होत नसतो

Why does blood sugar increase during fever or infection

हेही वाचा

येथे क्लिक करा

Eye Discharge: डोळ्यांच्या कोपऱ्यात चिपाड का जमा होते? कारणं आणि उपाय जाणून घ्या