Naigaon Travel : नायगावपासून हाकेच्या अंतरावर आहेत ७ सुंदर पिकनिक स्पॉट्स, फॅमिली ट्रिप करा प्लान

Shreya Maskar

नायगाव

नायगाव हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असलेले उपनगरीय किनारपट्टीचे शहर आणि रेल्वे स्थानक क्षेत्र आहे, जे मुंबई महानगर प्रदेशाचा भाग बनते.

Naigaon | google

पाझर तलाव

नायगाव पूर्व भागात चंडिका देवी मंदिराच्या जवळ पाझर तलाव वसलेले आहे. येथील पाणी स्वच्छ असून वातावरण अतिशय शांत आहे. त्यामुळे लहानशी पिकनिकसाठी उत्तम ठिकाण आहे.

Pazar Lake | google

उमेळा तलाव

नायगाव पश्चिम भागात उमेळा तलाव वसलेला आहे. गोलाकार तलाव आणि त्याभोवती चालण्यासाठी, जॉगिंगसाठी ट्रॅक आहे. ऑगस्ट महिन्यात जेव्हा तलाव पाण्याने भरतो आणि तिथे एक छोटा धबधबा तयार होतो, तेव्हा हे ठिकाण विशेषतः नयनरम्य दिसते.

Umela Lake | google

वसई किल्ला

वसईमध्ये थोड्या अंतरावर असलेला वसई किल्ला ऐतिहासिक समुद्रकिनारालगतचा किल्ला दाट झाडींनी वेढलेला आहे. छोट्या ट्रेकिंगसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.

Vasai Fort | google

तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यान

तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य वसई आणि विरारच्या पूर्वेला एका सुंदर डोंगराळ पठारावर आहे. येथे तुम्हाला वन्यजीवन खूप जवळून पाहता येईल.

Tungareshwar National Park | google

चिंचोटी धबधबा

नायगावच्या पूर्वेस कामण गावाजवळ १०० फूट उंचीचा भव्य चिंचोटी धबधबा दाट जंगलात वसलेला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील निसर्गप्रेमी आणि तरुणांसाठी पावसाळ्यातील हे एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे.

Chinchoti Falls | google

अर्नाळा बीच

अर्नाळा बीचला गेल्यावर तुम्हाला सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळेल. तसेच येथे बोटिंग आणि घोडेस्वारीची सेवा देखील उपलब्ध आहे.

Arnala Beach | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : 'दिव्या'जवळील ७ विरंगुळ्याची ठिकाणे, शहराच्या गोंगाटापासून दूर प्लान करा वन डे ट्रिप

Diva Travel | AI PHOTO
येथे क्लिक करा...