Budget 2025 Saam Tv
बिझनेस

Budget 2025: आयकर भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अर्थसंकल्पात कलम 80C अंतर्गत लिमिट वाढवण्याची शक्यता

Budget 2025 Descision On Section 80C: १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कलम 80C च्या लिमिटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन या १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात नागरिकांसाठी अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात. टॅक्सी कमी करण्याचाही निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आता 80C अंतर्गत मिळणाऱ्या सूटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या इन्मक टॅक्स अधिनियमन १९६१ अंतर्गत सध्या नागरिकांना १.५ लाखांची सूट मिळते.

सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु कलम 80C अंतर्गत लिमिट अजूनही वाढवली नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात हा मोठा निर्णय होऊ शकतो. (Budget 2025)

कलम 80C

कलम 80C चा वापर आयकर भरणारे नागरिक जास्तीत जास्त करतात. यात वैयक्तिक करदात्यांना आणि हिंदू अविभक्त कुटुंबाना गुंतवणूक आणि खर्चावर कर सवलत दिली जाते. जुन्या कर प्रणालीमध्ये आयकर रिटर्न भरणाऱ्या नागरिकांना कलम 80C अंतर्गत सूट मिळते. नवीन प्रणालीनुसार, एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. (Budget 2025)

कलम 80C अंतर्गत इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, युनिट लिंक्ड विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूकीवर सूट मिळते. तुम्ही जर पाच वर्षांसाठी टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करता त्यांनाही या कलमाअंतर्गत सूट मिळते. दोन मुलांपर्यंत ट्यूशन फीवरदेखील सूट मिळते. जीवन विमा प्रिमियम आणि नॅशनल पेमेंट सिस्टीमध्येही गुंतवणूक करणाऱ्या लोकांना कलम 80C अंतर्गत सूट मिळते.

बजेटमध्ये निर्णय होण्याची शक्यता

२०१४ नंतर कलम 80C अंतर्गत १.५ लाखांची सूट दिली जाते. गेल्या १० वर्षांपासून ही लिमिट स्थिर आहे. त्यामुळे टॅक्सपेयर्सचे म्हणणे आहे की, सध्या आर्थिक स्थिती सुधरवण्यासाठी प्रयत्न करायचे हवे. PB फिनटेक यांच्या म्हणण्यांनुसार, कलम 80C अंतर्गत पीपीएफ आणि होम लोनचा समावेश आहे. यामध्ये सूट द्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT