EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! आता UPI द्वारे घरबसल्या काढता येणार PF चे पैसे

PF Money Withraw Through UPI: ईपीएफओ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकणार आहात. यामुळे सर्व प्रक्रिया सोपी आणि जलद होणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असतेच. देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. पीएफमध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातून ठरावीक रक्कम जमा करतात. तेवढीच रक्कम कंपनीदेखील पीएफ अकाउंटमध्ये जमा करतात. पीएफ खातेधारकांसाठी एक आंदाची बातमी आहे. आता पीएप अकाउंटमधून पैसे काढणे अधिक सोपे होणार आहे. (EPFO Update)

आता पीएफचे पैसे काढण्यासाठी बँकेच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. तुम्ही घबसल्या यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढू शकतात. सरकार सध्या यावर काम करत आहे. लवकरच अशी सुविधा कर्मचाऱ्यांसाठी सुरु होणार आहे. त्यानंतर पीएफ खातेधारक क्लेम कोणत्याही यूपीआय प्लॅटफॉर्मवरुन प्रोसेस करु शकतात.

मिडिया रिपोर्टनुसार, पीएफची ही नवीन सिस्टीम पुढच्या तीन महिन्यात सुरु होऊ शकते. ही ट्रान्झॅक्शन सेवा आणि क्लेम प्रोसेस अधिक चांगली बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

UPI मधून काढता येणार पैसे (PF Money Withdraw Through UPI)

यूपीआयच्या माध्यमातून पीएफचे पैसे काढण्याच्या या सुविधेमुळे जलद आणि सोप्या पद्धतीने काम होणार आहे. हे नवीन फीचर गूगल पे, फोन पे आणि पेटीएम या यूपीआय प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केले जाणार आहे. यामुळे जर कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीत पीएफचे पैसे काढायचे असेल तर त्यांचे काम खूप सोपे आणि जलद होणार आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर यूजर्स डिजिटल वॉलेटमधून सहज पैसे ट्रान्सफर करु शकणार आहेत. यामुळे प्रोसेसिंगला कमी वेळ लागणार आहे. यामुळे बँकिंग डिटेल्स आणि वेरिफिकेशनची प्रक्रिया कमी होणार आहे. ईपीएफओ खातेधारक थेट डिजिटल पेमेंट अॅपवरुन पैसे काढू शकणार आहेत. ही सुविधा लवकरात लवकर आणू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

SCROLL FOR NEXT