Kalyan: दगडाने हल्ला चढवला अन् मग लुटले पैसे, दोघांचा भाजी विक्रेत्यावर हल्ला; कल्याण हादरलं

Vegetable Seller Robbed in Kalyan: कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या स्कायवॉकवर दोन चोरट्यांनी हल्ला करत भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Kalyan Crime
Kalyan CrimeSaam Tv News
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याणमध्ये गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. अशातच कल्याणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या स्कायवॉकवर दोन चोरट्यांनी हल्ला चढवला आहे. दोन चोरट्यांनी दगडाने हल्ला करत भाजी विक्रत्याला दगडाने ठेचून रोकड लुबाडले आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या स्कायवॉकवर हाणामारीची घटना घडली आहे. दोन चोरट्यांनी दगडाने हल्ला करत भाजी विक्रेत्याचा मोबाईल आणि रोकड लुबाडल्याची घटना घडली आहे. सुरेश सिंह असे पीडित भाजी विक्रेत्याचं नाव आहे. भाजीविक्रीसाठी भाजी घेण्यासाठी सुरेश २० फेब्रुवारीला कल्याण पूर्व येथून स्कायवॉकवरून कल्याण रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होते.

Kalyan Crime
Mumbai Court: मला तू आवडतेस... महिलेला मेसेज पाठवणं भोवलं, थेट तुरूंगात रवानगी

याचदरम्यान दोन चोरट्यानी त्यांना हटकले. सुरेश यांना दगडाने मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल आणि सहा हजार रुपये लुबाडून पळ काढला. या घटनेत सुरेश गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणानंतर कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyan Crime
Crime News: गवंडीच्या प्रेमात बुडाली, नवऱ्याला संपवण्याचा कट आखला; आधी झोपेच्या गोळ्या दिल्या, मग जिवंत जाळले

तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध सुरू आहे. या स्कायवॉकवरून दररोज हजारो प्रवासी ये जा करत असतात. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com