Mumbai Court: मला तू आवडतेस... महिलेला मेसेज पाठवणं भोवलं, थेट तुरूंगात रवानगी

Mumbai Court Verdict on Harassment: माजी नगरसेवकाला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणं भोवलं. महिलेनं पोलीस ठाण्यात घेतली धाव, कोर्टात गेलं प्रकरण.
मुंबई उच्च न्यायालय
Mumbai High Court Yandex
Published On

तुझी फिगर खूप भारी आहे. तू स्मार्ट दिसतेस. तुझा रंग गोरा आहे. तू मला खूप आवडतेस, यासारखे मेसेज माजी नगरसेवक महिलेला व्हॉट्सअॅपवर पाठवणं, एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. माजी नगरसेवक महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून अश्लील मेसेज आले होते. व्हॉट्सअॅपवरील अश्लील मेसेज वाचल्यानंतर महिलेचा पारा चढला. तिने थेट पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी तात्काळ मोबाईल क्रमांक ट्रेस करत आरोपीला बेड्या ठोकल्या. कोर्टाकडून या प्रकरणावर गंभीर अशी टिप्पणी करण्यात आली. अश्लील मेसेज पाठवणं एखाद्या महिलेचा अपमान करण्यासारखं आहे, असं मुंबई सत्र न्यायालयानं निकाल देताना म्हटले. महिलेला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आरोपीचे नरसिंग गुडे असून त्याला तीन महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीजी ढोबळे यांनी सांगितले की, २६ जानेवारी २०१६ ला महिला मुंबईच्या बोरिवली परिसरातील नगरसेवक होती. त्यावेळी तिच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी व्यक्तीनं रात्री संदेश पाठवला होता. 'तू झोपली आहेस का? तू विवाहीत आहेस का? तू खूप स्मार्ट दिसतेस, तू खूप गोरी दिसतेस, मला तू आवडतेस, मी ४० वर्षांचा आहे, उद्या आपण भेटू', असा मेसेज महिलेला आला होता.

त्यानंतर महिलेनं तिच्या पतीला याबद्दलची माहिती दिली. पतीने त्या अज्ञात नंबरवर कॉल केला. त्यावेळी हा नंबर नरसिंग गुडे या व्यक्तीचा असल्याचं समोर आलं. गुडे याने रात्री महिलेला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले. त्यानंतर माजी नगरसेवक आणि त्याच्या पतीने पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून गुडे याला बेड्या ठोकण्यात आल्या, त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टामध्ये दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला, त्यानतर कोर्टाने महत्त्वाचे निरिक्षण नोंदवले. महिलेला पाठवण्यात आलेले मेसेज आणि फोटो अश्लील असल्याचे कोर्टाने मत नोंदवले.

मुंबई उच्च न्यायालय
Crime News: गवंडीच्या प्रेमात बुडाली, नवऱ्याला संपवण्याचा कट आखला; आधी झोपेच्या गोळ्या दिल्या, मग जिवंत जाळले

कोर्टाने निकाल देताना काय म्हटले?

कोणतीही विवाहित महिला किंवा तिचा पती रात्री अशा प्रकारचे मेसेज आले तर सहन करू शकत नाही. विशेषत: जेव्हा ती व्यक्ती ओळखीची नसेल. अश्लील फोटो आणि मेसेज महिलांना अपमानीत करतात, असे कोर्टाने निकाल देताना म्हटले.

मुंबई उच्च न्यायालय
Amit Shah: अमित शहांच्या दौऱ्यामुळे पुण्यातील वाहतूकीत बदल, पुणेकरांनो घ्या नोंद

न्यायालयानं पुढे म्हटलं की, 'कोणतीही महिला एखाद्याला खोट्या प्रकरणात अडकवून स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. माजी नगरसेवक महिलेला आरोपीकडून मेसेज आणि अश्लील फोटो पाठवण्यात आल्याचे, पुरावे आणि जबाबावरून स्पष्ट होतेय. हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. त्यामुळे आरोपीला तीन महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com