Gold-Silver Price Today Saam tv
बिझनेस

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं ६००० रुपयांनी झालं स्वस्त, आजचे 18K- 22K आणि 24K चे दर किती?

Gold-Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. तर चांदीचे दर स्थिर आहेत. त्यामुळे आज खरेदीची सुवर्णसंधी आहे.

Priya More
  • सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज

  • १० तोळे सोनं ६००० रुपयांनी स्वस्त

  • चांदीचे दर आज स्थिर आहेत

  • १ किलो चांदी २,८०,००० रुपयांना विकली जात आहे

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली तर चांदीचे दर स्थिर आहेत. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळाले. सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातवरण आहे. आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोनं ६००० रुपयांनी स्वस्त झालं. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी १८,२२ आणि २४ कॅरेटच्या सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ६०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तु्म्हाला १,५७,०४० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ६००० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १५,७०,४०० रुपये मोजावे लागतील.

२२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये आज ५५० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,४३,९५० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५५०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १४,३९,५०० रुपये मोजावे लागतील.

२४,२२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,१७,७८० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटचे १० तोळा सोनं ४५०० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ११,७७,८०० रुपये मोजावे लागतील.

दरम्यान, आज चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. १ ग्रॅम चांदी २८० रुपयांना विकली जात आहे. आज १ किलो चांदीसाठी २,८०,००० रुपये किंमत मोजावी लागेल. आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahi Tukda Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Sanju Samson : भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान संजू सॅमसनचा मोठा निर्णय; अचानक स्पर्धेतून नाव घेतलं मागे; सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

भीषण अपघात! कार दरीत कोसळली, वाहन बाहेर काढताच आतमध्ये असलेलं घबाड पाहून पोलीसही चक्रावले

Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT