Gold prices surge sharply as investors shift focus to safe-haven assets amid easing global tensions. Saam Tv
बिझनेस

सराफा बाजार बंद होताना सोन्याच्या दरात मोठा बदल, जळगावच्या सुवर्णबाजारात आजचा दर काय? वाचा 22k, 24k चा ताजा भाव

Gold Prices Surge by ₹5,000 Per Tola Amid Easing War Tensions: इराण-इस्रायल-अमेरिका तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे जळगावमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा दर ५ हजारांनी वाढून १,४५,५०० वर पोहोचला असून गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सुरक्षित पर्यायाकडे वळला आहे.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव: इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाची तीव्रता कमी होण्याची चिन्हे दिसू लागताच जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीत स्थिरता येण्याची शक्यता निर्माण होताच गुंतवणूकदारांचा कल पुन्हा मौल्यवान धातूंकडे वळल्याचं चित्र आहे. काल जीएसटीशिवाय १,४०,५०० रुपयांवर असलेले सोन्याचे दर आज तब्बल ५ हजार रुपयांनी वाढून १,४५,५०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून २,२०,००० रुपयांवरून ती थेट २,४०,००० रुपयांवर गेली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्णपणे युद्धविराम झाला तर सोन्याचे दर पुन्हा स्थिर होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली तर सोने-चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

युद्धजन्य परिस्थितिमुळे देशभरात गॅस, इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल आणि खानावळ व्यावसायिकांची अडचण निर्माण अली असून महाविद्यालयीन विद्यार्थि, कामगार वर्ग यांनी गावाची वाट पकडली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोनासारखी परिस्थिति निर्माण होऊ शकते असा इशारा दिला आहे. अशातच सोन्याचे दर देखील वर खाली होत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत चालला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT