Customers check gold ornaments at a jewellery store as prices surge amid global war tensions. Saam Tv
बिझनेस

युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी; प्रति तोळ्यात किती रुपयांनी वाढ होणार?

Impact Of Middle East Conflict On Gold Rates In India: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रति तोळा सोने १५ ते २० हजारांनी वाढले असून चांदीतही ३० हजारांची उसळी पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

इराण-इस्रायल आणि अमेरिकासह मध्य पूर्व देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या बाजारावर होत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय तणाव, हवाई वाहतूक बंद आणि माल आयात ठप्प झाल्याने मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोने व्यापारी १२१ फत्तेचंद रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल १५ ते २० हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे सुमारे ३० हजार रुपयांची उसळी पाहायला मिळत आहे.

युद्धाचे वातावरण असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातून माल येणे बंद झाले आहे. विशेषतः हवाई वाहतूक खंडित झाल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा थेट फटका बाजाराला बसत आहे. दरम्यान बँकांकडूनही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी सुरू असल्याने मागणी वाढली आहे. भारताला दरवर्षी सुमारे ९०० टन सोन्याची गरज भासते. अशा परिस्थितीत पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

येत्या काही दिवसांत गुढीपाडवा, अक्षय तृतीया तसेच लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. पारंपरिकरीत्या या काळात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. मात्र वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. युद्ध परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात सोन्या-चांदीचे दर आणखी वाढत राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Maharashtra News Live Update: सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता?

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

Godrej Professional Vibe Collection: मुंबईत लॉन्च झालं नवीन हेअर कलर कलेक्शन; 1000 हून अधिक हेअर स्टायलिस्ट्सना मिळणार नोकरी

SCROLL FOR NEXT